Locusts Attack: 'दंगल' अभिनेत्री झायरा वसीमने टोळधाडीच्या हल्ल्याला म्हटले अल्लाचा कहर, यूजर्सचा संताप पाहून ट्विट केले डिलीट

टोळधाडी एक नवीन समस्या बनली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशसह भारतातील बऱ्याच राज्यांत कोटी टोळधाडींनी प्रवेश केला आहे. या सर्वांमध्ये बॉलीवूडची माजी अभिनेत्री झायरा वसीमने कुराणचा पद्य शेअर करत त्याच्याद्वारे टोळधाडीच्या हल्ल्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे यूजर्स भडकले आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरवात केली. त्यानंतर जायराने ट्विट हटवले.

झायरा वसीम (Photo Credit-Facebook)

2020 मध्ये एकामागून एक लोकांसमोर कठीण परिस्थिती उदभवत आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांसाठी आता पाकिस्तानातून येणारी टोळधाडी (Locusts) एक नवीन समस्या बनली आहे. राजस्थान, मध्य प्रदेशसह भारतातील बऱ्याच राज्यांत कोटी टोळधाडींनी प्रवेश केला आहे. हे केवळ शेतकर्‍यांसाठी त्रासदायक ठरले नाही, तर असंख्य टोळधाड पाहून सरकारही अस्वस्थ झाले आहे. टोळधाडीचे वृत्त सध्या सोशल मीडियावर अधिक ट्रेंड होत आहे. टोळधाडीने जवळजवळ उत्तर भारत काबीज करून आता महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्यापासून बचाव करण्यासाठी, त्यांना पळवण्यासाठी सल्ला देत आहेत. या सर्वांमध्ये बॉलीवूडची माजी अभिनेत्री झायरा वसीमने (Zaira Wasim) एक ट्विट केले ज्यामुळे लोकांच्या संतापाची मर्यादाच राहिली नाही. 'दंगल' आणि 'सिक्रेट सुपरस्टार'सारख्या चित्रपटुन आपली ओळख निर्माण करणारी झायरा बॉलीवूडमधून यापूर्वीच बाहेर पडली. (Locusts Seen in Mumbai?: मुंबईला टोळधाडीचा धोका नाही; व्हायरल होत आहेत फेक फोटो व व्हिडिओ, BMC ने दिले स्पष्टीकरण)

जायराने कुराणचा पद्य शेअर करत त्याच्याद्वारे टोळधाडीच्या हल्ल्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे यूजर्स भडकले आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरवात केली. त्यानंतर जायराने ट्विट हटवले. पाहा जायराच्या ट्विटवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

एका यूजरने म्हटले जर ते चीनमध्ये असते तर लोक देवाचे आभार मानले असते

यूजरने अशाप्रकारे फटकारले

यूजरने जायराच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केले

इस्लाममध्ये ट्विट करणे निषिद्ध आहे…

इतका कट्टरपणा आणि द्वेष

शिक्षण आणि धर्मनिरपेक्षता ही कधीच कट्टरपंथी इस्लामवादाचे उत्तर होऊ शकत नाही.

जायराने तिचा अखेरचा चित्रपट, 'द स्काई इज पिंक',च्या रिलीजच्या अगोदर इस्लामचा हवाला देऊन सोशल मीडियावर अचानक चित्रपटसृष्टीपासून स्वत:ला दूर केले. जायराच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now