अखेर Rakhi Sawant अडकली विवाहबंधनात; बॉयफ्रेंड Adil Khan Durrani सोबत केला निकाह, See Photos

एका छायाचित्रात राखी लग्नाच्या प्रमाणपत्रावर सही करताना दिसत आहे. या फोटोवरून दिसत आहे की, त्यांच्या लग्नाची नोंदणी गेल्या वर्षीच झाली होती आणि आता हे फोटो समोर आले आहेत. प्रमाणपत्रात दोघांच्या लग्नाची तारीख 2 जुलै 2022 आहे.

अखेर Rakhi Sawant अडकली विवाहबंधनात; बॉयफ्रेंड Adil Khan Durrani सोबत केला निकाह, See Photos
Rakhi Sawant (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी राखी सावंत (Rakhi Sawant) आता पुन्हा एकदा तिच्या एका नव्या लग्नामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत व तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. आता माहिती मिळत आहे की, जुलै 2022 मध्येच राखीने तिचा प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केले आहे. या दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत,  ज्यामध्ये राखी तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत लग्नाच्या वेशात दिसत आहे.

राखी आणि दुर्राणी यांच्या गळ्यात माळ असून, दोघे कोर्ट मॅरेजशी संबंधित कागदपत्रे दाखवत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. परंतु एका रिपोर्टनुसार, राखीने असेही म्हटले आहे की, आदिलने राखीशी लग्न झाल्याची गोष्ट नाकारली आहे.

रिपोर्टनुसार, राखीने स्वतः निकाहची कबुली दिली आहे. राखीने सांगितले की, सात महिन्यांपूर्वी तिने आदिलसोबत कोर्ट मॅरेज आणि निकाह केला होता. राखीच्या म्हणण्यानुसार, आदिलने तिला लग्न गुप्त ठेवण्यास सांगितले होते. याआधी बॉलिवूड फोटोग्राफर 'विरल भयानी'ने राखी सावंत आणि आदिलचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत, दोघांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Telly Talk (@tellytalkindia)

दुसऱ्या एका छायाचित्रात राखी लग्नाच्या प्रमाणपत्रावर सही करताना दिसत आहे. या फोटोवरून दिसत आहे की, त्यांच्या लग्नाची नोंदणी गेल्या वर्षीच झाली होती आणि आता हे फोटो समोर आले आहेत. प्रमाणपत्रात दोघांच्या लग्नाची तारीख 2 जुलै 2022 आहे. तसेच राखी सावंतचे नाव 'फातिमा' दिसत आहे. इस्लामिक विवाहामध्ये, मुलगी दुसऱ्या धर्मातील असल्यास, लग्नासाठी तिला धर्मांतर करणे आवश्यक असते आणि तिला नवीन उर्दू नाव दिले जाते. (हेही वाचा: Uorfi Javed Nudity Row: अमृता फडणवीस यांचा उर्फी जावेदला पाठींबा; म्हणाल्या- 'महिला म्हणून तिने जे काही केले आहे त्यात काहीही चुकीचे नाही')

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, गायक मिका सिंगसोबत झालेल्या भांडणानंतर राखी सावंत चर्चेत आली होती. राखी सावंतने याआधी बिझनेसमन रितेशशी लग्न केले होते आणि राखीने ते लग्नही बरेच दिवस गुप्त ठेवले होते. राखी 'NDTV Imagine' वर प्रसारित झालेल्या 'राखी का स्वयंवर' या रिअॅलिटी शोचा देखील एक भाग होती. अंतिम फेरीत, राखी सावंतने तीन अंतिम स्पर्धकांमधून तिचा भावी वर म्हणून टोरंटो येथील कॅनेडियन व्यावसायिक एलेश पारुजनवाला यांची निवड केली होती. मात्र तिने हे लग्न केले नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2023 07:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).