Filmmaker Manish Gupta Booked: लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक मनीष गुप्तावर ड्रायव्हरवर चाकू हल्ला केल्याचा आरोप; पगाराच्या वादातून घडली घटना, गुन्हा दाखल

लष्कर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, आणि त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. लष्कर यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी मनीष गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Filmmaker Manish Gupta Booked

‘डरना जरूरी है’, ‘रहस्य’, ‘द स्टोनमॅन मर्डर्स’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक मनीष गुप्ता (Manish Gupta) यांच्यावर त्यांच्या ड्रायव्हरवर चाकूहल्ला केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. वर्सोवा पोलिसांनी मनीष गुप्ता यांच्याविरुद्ध 6 जून रोजी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हा वाद गुप्ता यांच्या वर्सोव्यातील सागर संजोग इमारतीतील निवासस्थानी 5 जून रोजी सायंकाळी घडला, जिथे त्यांनी आपल्या ड्रायव्हरवर, मोहम्मद लष्कर याच्यावर, थकीत पगाराच्या वादातून चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, गुप्ता यांना अद्याप अटक झालेली नाही.

राजीबुल इस्लाम लष्कर (32) हे मनीष गुप्ता यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते. 30 मे रोजी गुप्ता यांनी लष्कर यांना नोकरीवरून काढून टाकले, परंतु त्यांचा मागील महिन्याचा पगार अद्याप दिला नव्हता. 3 जून रोजी लष्कर यांनी गुप्ता यांच्याशी संपर्क साधून थकीत पगाराची मागणी केली. यावर गुप्ता यांनी लष्कर यांना पुन्हा कामावर येण्यास सांगितले, तरच पगार दिला जाईल, असे सांगितल्याचा आरोप आहे. या विषयावरून 5 जून रोजी दोघांमध्ये तीव्र वाद झाला. या वादादरम्यान गुप्ता यांनी स्वयंपाकघरातील चाकूने लष्कर यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. (हेही वाचा: Pune Shocker: लैंगिक संबंधाला नकार दिल्याने 21 वर्षीय तरुणाने केली 50 वर्षीय व्यक्तीची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना, आरोपीला अटक)

लष्कर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, आणि त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. लष्कर यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी मनीष गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लष्कर यांचे वकील, अली काशिफ खान देशमुख, यांनी गुप्ता यांच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप गुप्ता यांना अटक केलेली नाही आणि तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, ते दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवत आहेत आणि घटनास्थळावरील पुरावे गोळा करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement