Pune Shocker: लैंगिक संबंधाला नकार दिल्याने 21 वर्षीय तरुणाने केली 50 वर्षीय व्यक्तीची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना, आरोपीला अटक

गुन्हा केल्यानंतर, रमेश शिरूर येथील त्याच्या भावाच्या फ्लॅटमध्ये लपला होता. माहितीवरून कारवाई करत, गुन्हे शाखा युनिटमधील एक पथक ताबडतोब शिरूरला रवाना झाले, जिथे त्यांनी आरोपीला यशस्वीरित्या अटक केली.

Pune Shocker: लैंगिक संबंधाला नकार दिल्याने 21 वर्षीय तरुणाने केली 50 वर्षीय व्यक्तीची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना, आरोपीला अटक
Representational Image (Photo Credits: File Image)

पुण्यातील (Pune) विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी लैंगिक संबंधास (Sexual Favours) नकार दिल्याने एका तरुणाने सुमारे 50 वर्षीय पुरूषाची हत्या केली. बुधवारी मंडई मेट्रो स्टेशनसमोरील एका इमारतीच्या पार्किंग क्षेत्रात रक्ताच्या थारोळ्यात 50 ते 55 वयोगटातील एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला. रमेश प्रकाश सत्रे असे आरोपीचे नाव असून, तो 21 वर्षांचा आहे. रमेश हा कातार्ड गाव, राहुरी, अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी व्यक्तीला ससून रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गुन्हा केल्यानंतर, रमेश शिरूर येथील त्याच्या भावाच्या फ्लॅटमध्ये लपला होता. माहितीवरून कारवाई करत, गुन्हे शाखा युनिटमधील एक पथक ताबडतोब शिरूरला रवाना झाले, जिथे त्यांनी आरोपीला यशस्वीरित्या अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक (क्राइम ब्रँच युनिट-1) शब्बीर सय्यद यांनी द फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, पीडित आणि आरोपी यांच्यातील शारीरिक संबंधातून उद्भवलेल्या वादातून ही हत्या झाली आहे. (हेही वाचा: Tamil Nadu Shocker: तामिळनाडूच्या रानीपेटमध्ये 80 वर्षीय महिलेवर 19 वर्षीय तरुणाचा लैंगिक अत्याचार; प्रतिकार केल्यानंतर केली हत्या)

आरोपी लैंगिक लाभाची मागणी करत होता. मात्र, पिडीत व्यक्तीने याचा विरोध केल्यावर रमेशने त्याची हत्या केली. रमेशने पीडितेच्या मानेवर धारदार चाकूने वार केले, ज्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, आरोपी अहिल्यानगरचा रहिवासी आहे आणि नोकरीच्या शोधात 3-4 महिन्यांपूर्वी पुण्यात आला होता. या घटनेनंतर, विश्रामबाग पोलीस ठाण्यात भादंवि कलम 103(1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2025 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).