Father's Day 2019: वरुण धवन याला वडिलांनी मारली कानाखाली, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video)
बॉलिवूड कलाकार वरुण धवन (Varun Dhawan) याला त्याच्या वडिल डेविड धवन (David Dhawan) यांनी कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
आज (16 जून) सर्वत्र फादर्स डे (Father's Day) साजरा करण्यात येत आहे. तत्पूर्वी बॉलिवूड कलाकार वरुण धवन (Varun Dhawan) याला त्याच्या वडिल डेविड धवन (David Dhawan) यांनी कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचसोबत वरुण याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला त्याने एक कॅप्शन दिले असून 'बाप बाप होता है' असे म्हटले आहे.
वरुण धवन याला डेविड धवन यांनी कानाखाली मारलेला व्हिडिओ हा इन्स्टाग्रावरील फिचर्स बुमरँग पद्धतीचा असून तो मजेदार पद्धतीचा आहे. आज फादर्स डे निमित्त वरुण धवन याने त्याच्या वडिलांवरील प्रेम व्यक्त करत त्यांनी मारलेली कानाखालीसुद्धा प्रेमाची वाटते असे सांगितले आहे.
त्याचसोबत शाहरुख खान याने आपला मुलगा आर्यन खान याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोत शाहरुख आणि आर्यन यांनी निळ्या रंगातील जर्सी घातली असून त्यावर 'मुफासा' आणि 'सिम्बा' असे लिहिले आहे.
तसेच शाहरुख याने आज भारत विरुद्ध पाकिस्तान संघात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.