दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 5 लाखांवरुन थेट 75 हजारावर

तसेच सामाजिक घटनांवर आधारित काही गोष्टी घडल्यास त्यावर मात्र तो भाष्य जरुर करतो. तर सध्या देशात सुरु असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनात आपला सहभाग दर्शवला होता.

Anurag Kashyap (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) नेहमीच सोशल मीडियात अॅक्टीव्ह असतो. तसेच सामाजिक घटनांवर आधारित काही गोष्टी घडल्यास त्यावर मात्र तो भाष्य जरुर करतो. तर सध्या देशात सुरु असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनात आपला सहभाग दर्शवला होता. त्यानंतर अनुराग याने एक ट्वीट केले असून त्याने असा दावा केला आहे की, त्याच्या ट्विटर वरील फोलॉअर्सच्या संख्येत भारदस्त घट झाली आहे. या ट्वीट मधून त्याने ट्वीटर इंडियावर निशाणा साधला आहे.

खरंतर अनुराग कश्यप याच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 5 लाखांपेक्षा अधिक होती. मात्र आता याच फोलोअर्सच्या संख्येत घट झाली असून त्याचा आकडा 76.3 हजारांवर आला आहे. याच प्रकरणी तक्रार करण्यासाठी अनुराग याने ट्वीट करत म्हटले आहे की, ट्विटर इंडियाने माझ्या फॉलोअर्सच्या संख्येत घट केली आहे.(CAA Protest: आमच्या पंतप्रधानाला केवळ नाटकी भाषण करता येते; अनुराग कश्यप याचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल) 

Tweet:

सोशल मीडियात काही युदर्सनी त्याच्या पूर्वीच्या फोलोअर्सची संख्येचा स्क्रिनशॉट आणि आताची फॉलोअर्स संख्या किती आहे याचा फोटो शेअर केला आहे. या प्रकरणी अनुराग याला त्याच्या चाहत्यांकडून एक सपोर्ट मिळाला आहे. काही युजर्सने असे म्हटले आहे की, यापूर्वी आम्ही अनुराग याला फोलो करत होतो पण आता स्वत:हून अनफॉलो केले आहे.

Tweet:

अनुराग याने खुप दिवसानंतर पुन्हा एकदा ट्विटरवर अॅक्टिव्ह होण्यास सुरुवात केली आहे. मुलीला धमकी मिळाल्यानंतर त्याने स्वत:ला ट्विटरवरुन हटवले होते. मात्र आता ट्विटरवर पुन्हा परत आल्यानंतर त्याच्या फॉलोअर्सची संख्या फारच कमी झाली आहे.