Varun Dhawan आणि Sara Ali Khan च्या कुली नंबर 1 वर बहिष्कार घालण्याची मागणी; ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटर वर #BoycottCoolieNo1 ट्रेंडींग

वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) स्टारर चित्रपट कुली नंबर 1 (Coolie No 1) चा पहिला ट्रेलर आज इंटरनेटवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट दिग्दर्शक आणि वरुणचे वडील डेव्हिड धवनचा 45 वा चित्रपट आहे.

Varun Dhawan आणि Sara Ali Khan च्या कुली नंबर 1 वर बहिष्कार घालण्याची मागणी; ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटर वर #BoycottCoolieNo1 ट्रेंडींग
Boycott Coolie No 1 Trends (Photo Credits: Twitter)

वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) स्टारर चित्रपट कुली नंबर 1 (Coolie No 1) चा पहिला ट्रेलर आज इंटरनेटवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट दिग्दर्शक आणि वरुणचे वडील डेव्हिड धवनचा 45 वा चित्रपट आहे. हा चित्रपट 90 च्या दशकातील करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्या चित्रपटाचा रिमेक आहे. या ट्रेलरला यूट्यूबवर 6.8 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, मात्र याच्या लाईक्स आणि डिसलाईक्स लपवून ठेवल्या आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनानंतर आता ट्वीटरवर #BoycottCoolieNo1 ट्रेंड व्हायला सुरुवात झाली आहे.

याबाबत अनेकांनी ट्वीट करत या चित्रपटावर बहिष्कार घालावा अशी मागणी केली आहे. तर, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला काही महिने उलटूनही लोक त्याच्यासोबत जे घडले ते विसरू शकले नाही. बॉलिवूडमधील घराणेशाही, कंपूशाहीमुळेच सुशांतने आत्महत्या केली असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यात आता वरून आणि सारा हे दोघेही बॉलिवूडमधील घराणेशाहीचा भाग असल्याने जस्टिस फॉर एसएसआर आर्मीने कुली नंबर 1 चित्रपटावर बहिष्कार घालण्यात यावा अशी मागणी केली आहे. सुशांतसिंह राजपूत यांच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी प्रदर्शित झालेल्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होते. आता कुली नंबर 1 बाबत तेच घडत आहे.

दरम्यान, कुली नंबर-1 च्या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर अनेक इतरही मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. ‘गोविंदा’ देखील ट्विटरवर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली आहे. हे सर्व मीम्स पाहून लक्षात येत आहे की हा ट्रेलर लोकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला आहे. अनेक जणांनी वरून आणि साराच्या अभिनयाला सुमार म्हटले आहे. तर अनेकांनी या दोघांची तुलना गोविंदा आणि करिष्माशी करून ट्रेलर पाहून रसभंग झाल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा: वरुण धवन आणि सारा अली खान यांचा कुली नंबर 1 चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आला समोर, हसून व्हाल लोटपोट)

कोरोना विषाणूमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाला उशीर झाला असून आता तो थेट अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये चित्रपटाने आधीच त्याचे पैसे कमावले आहेत, त्यामुळे लोकांनी बहिष्काराची मागणी जरी केली तरी निर्मात्यांचे काहीही नुकसान होणार नाही.

(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2020 11:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).