Deepfake Row: डीपफेक व्हिडिओबाबत सरकारचे कठोर पाऊल; दोषी आढळल्यास होऊ शकतो तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड
यामध्ये आयटी नियम 2023 नमूद करण्यात आले आहेत. तसेच आयपीसीचाही उल्लेख करण्यात आला आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) हिचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकार पुन्हा एकदा अशा कंटेंटबाबत कठोर झाले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांना एक अॅडव्हायझरी जारी केली आहे आणि सध्या लागू असलेल्या अॅडव्हायझरीचा पुनरुच्चार केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, अशा कृत्यामध्ये गुंतलेल्या लोकांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.
आयटी कायदा 2000 च्या कलम 66E अंतर्गत परवानगीशिवाय कोणाचेही फोटो आणि व्हिडिओ बनवल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. या नियमांतर्गत गोपनीयतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास कारवाई करण्याचा नियम आहे. यामध्ये परवानगीशिवाय कुणाचा वैयक्तिक फोटो काढून शेअर केल्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाऊ शकते.
आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये, सॉफ्टवेअर किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एखाद्याचा अश्लील फोटो तयार करून शेअर केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. असे वारंवार केल्यास 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंड होऊ शकतो.
डीपफेक व्हिडिओबाबत आयपीसीच्या कलम 66C, 66E आणि 67 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये आयपीसी कलम 153A आणि 295A अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाऊ शकते. सोशल मीडिया कंपन्यांना देखील नियम आणि गोपनीयता धोरणाचे पालन करावे लागेल. सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांना असा मजकूर पोस्ट करणे थांबवावे लागेल. नियम 3(2)(b) नुसार, तक्रार मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत कोणतीही सामग्री त्याच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावी लागेल. (हेही वाचा: Rashmika Mandanna Morphed Viral Video: रश्मिका मंदानाचा मॉर्फ केलेला व्हिडिओ वायरल झाल्यानंतर Union Minister Rajeev Chandrasekhar यांचे कठोर कारवाईचे आदेश)
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनाही डीपफेकच्या विरोधात तक्रार करण्यासाठी लोकांना नियमांची आठवण करून दिली आहे. यामध्ये आयटी नियम 2023 नमूद करण्यात आले आहेत. तसेच आयपीसीचाही उल्लेख करण्यात आला आहे. व्हिडिओ खरा ही की खोटा हे ओळखण्यासाठी, डीपफेक व्हिडिओ ओळ प्ले केल्यावर डोळ्यांच्या आणि डोक्याच्या हालचालींवरून तो ओळखला जाऊ शकतो. एआय (AI) जनरेट केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये हात आणि पायांची लांबी सारखी नसते. अशा प्रकारे असे व्हिडिओ ओळखले जाऊ शकतात.