COVID-19: बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन हिला कोरोनाची लागण- रिपोर्ट्स
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 96 लाखांच्या पार गेला आहे. या स्थिती पासून बॉलिवूड कलाकार ही बचावले गेले नाही आहेत. नुकत्याच वरुण धवन, नीतू कपूर आणि मनिष पॉल यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले होते.
COVID-19: कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 96 लाखांच्या पार गेला आहे. या स्थिती पासून बॉलिवूड कलाकार ही बचावले गेले नाही आहेत. नुकत्याच वरुण धवन, नीतू कपूर आणि मनिष पॉल यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता कृति सेनन (Kriti Sanon) हिला कोरोनाची लागण झाल्याचे एका बातमीमधून समोर येत आहे. कृति सेनन ही चंदीगढ येथे राजकुमार राव याच्यासोबत तिचा आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याच वेळी तिला कोरोनाची लागण झाली आहे. कृतिच्या नजीकच्या सोर्सकडून ही माहिती देण्यात आली आहे. कृति हिने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
यापूर्वी कृति हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आगामी चित्रपटाबद्दल सांगितले होते. त्यानंतर कृति हिची सोशल मीडियात कोणतीच नवी पोस्ट दिसून आलेली नाही आहे.(Maniesh Paul Tests Positive for COVID-19: 'जुग जुग जियो' सिनेमाच्या टीम मधील वरूण धवन, नीतू कपूर पाठोपाठ मनीष पॉल देखील कोरोनाच्या विळख्यात)
दरम्यान, चित्रपट जुग जुग जियो च्या टीम मधील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. त्यामध्ये वरुण धवन, नीतू कपूर, मनीष पॉल याच्यासह दिग्दर्शक राज मेहता यांचे सुद्धा नाव आहे. तर चित्रपटात काम करणारे अनिल कपूर आणि कियारा अडवाणी यांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले आहेत.
याआधी वरुण याने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मित्रांसोबत एक फोटो शेअर करत कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्याने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन ही केले होते.