Sushant Singh Rajput Death Case: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात CBI ने रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ, मॅनेजरसह इतरांविरुद्ध FIR दाखल केला
बिहार सरकारच्या सूचनेवरून केंद्र सरकारने सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीला बुधवारी मान्यता दिली.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात सीबीआयने (CBI) आपली चौकशी सुरू केली आहे. बिहार सरकारच्या सूचनेवरून केंद्र सरकारने सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीला बुधवारी मान्यता दिली. आता बातमी येत आहे की सीबीआयने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयने रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरूद्ध एफआयआर (FIR) नोंदविला आहे. या प्रकरणात सीबीआय बिहार पोलिसांच्या संपर्कात आहे. रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांवर आत्महत्येला प्रवृत्त करणे, गुन्हेगारी कट, चोरी, फसवणूक आणि धमकी यासारख्या आरोपांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून मुंबई पोलिस वेगवेगळ्या प्रकारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पाटणा येथे राहणारे सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांच्या तक्रारीवरून बिहार पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. यापूर्वी सुशांत सिंहचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीवरून पाटण्यात रियाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. बिहार पोलिसांनी याबाबत मुंबईमध्येही चौकशी केली होती. आता सीबीआयने या प्रकरणाची सूत्रे हातात घेतली आहे.
एएनआय ट्वीट -
या प्रकरणात पोलिस अधीक्षक (एसपी) नुपूर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. डीआयजी गगनदीप गंभीर व सहसंचालक मनोज शशिधर हे त्याचे परीक्षण करतील. हे दोघेही गुजरात केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. (हेही वाचा: टीव्ही अभिनेता Sameer Sharma चे निधन, मुंबईतील राहत्या घरात आढळला मृतदेह, आत्महत्या केल्याचा संशय)
काल बुधवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सीबीआयकडे हा विषय तत्वत: पाठवण्याची शिफारस त्यांनी मान्य केली आहे. बिहारमध्ये दाखल केलेला खटला महाराष्ट्रात हस्तांतरित करण्याच्या रिया चक्रवर्तीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकार, सुशांतचे वडील आणि अन्य पक्षांना तीन दिवसांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. इतकेच नव्हे तर कोर्टाने महाराष्ट्र सरकारला आतापर्यंतच्या तपासाची स्थिती नोंदविण्यास सांगितले होते. सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करणार्या ईडी (ED) ने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला शुक्रवारी चौकशीसाठी बोलवले आहे.