C U Soon Full Movie Leaked on TamilRockers & Telegram for Free Download: मल्याळम चित्रपट 'सी यू सून’ ला ऑनलाईन पायरसीचा धोका? तामिळ रॉकर्स, टेलीग्रामवर झाला लीक
C U Soon Poster (Photo Credits: Instagram)

सध्या कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) चित्रपटगृह बंद आहेत. अशात ऑनलाईन व्यासपीठे (OTT Platforms) निर्मात्यांच्या मदतीसाठी धावून आली आहेत. गेल्या 4-5 महिन्यांच्या लॉक डाऊनच्या काळात अनेक चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करण्यात आले आहेत. मात्र अशा चित्रपटांनाही मोठ्या प्रमाणात पायरसीचा (Piracy) धोका निर्माण झाला आहे. आता सप्टेंबर 2020 मधील एक बहुचर्चित मल्याळम थ्रिलर ‘सी यू सून’ (See You Soon) 1 सप्टेंबर रोजी, ‘ओणम’ च्या दिवशी प्रदर्शित झाला. मात्र लगेचच सर्च इंजिन प्लॅटफॉर्मवर, या चित्रपटाबाबतचे, C U Soon Movie Full HD Available, C U Soon movie download on Filmyzilla, C U Soon TamilRockers download असे कीवर्ड दिसून येत आहेत.

या चित्रपटात फहाद फासिल (Fahaadh Faasil), रोशन मॅथ्यू आणि दर्शना राजेंद्रन मुख्य भूमिकेत आहेत. महेश नारायणन हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक असून, Amazon Prime वर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट विविध ठिकाणी 1080p HD, 480p, 720p तसेच कॅम-चीर आवृत्तीमध्ये उपलब्ध असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर पायरसी चालू आहे. महत्वाचे म्हणजे हा चित्रपट त्याच्या एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने हाताळला गेल्याने चर्चेत आहे.

साधारण 60 मिनिटांचा हा चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला असून, सर्व चित्रीकरण फहादच्या घरी झाले आहे. C U Soon Full Movie Download, C U Soon Full Movie Tamilrockers, C U Soon Full Movie Tamilrockers HD Download, C U Soon Full Movie Download Tamilrockers, C U Soon Full Movie Telegram, C U Soon Telegram links, C U Soon Full Movie HD Telegram इ. सर्चेस हा चित्रपट पाहण्यासाठी वापरले जात आहेत. (हेही वाचा: टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानचा 'हॅक्ड' चित्रपट ठरला पायरसीचा शिकार)

दरम्यान, ऑनलाईन पायरेसीचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. चित्रपट उद्योगाला यामुळे फार मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म कमी दरात उपलब्ध असूनही, जवळजवळ प्रत्येक चित्रपटाची पायरसी होत आहे. याबाबत चित्रपट निर्मात्यांकडून बर्‍याच तक्रारी केल्या गेल्या आहेत परंतु अद्याप यावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.