Poonam Pandey Birthday: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. पूनम पांडे चा जन्म 11 मार्च 1991 रोजी दिल्ली येथे झाला होता. पूनम पांडेने बॉलिवूड आणि टीव्ही शोमध्ये काम केलं. मात्र, यात ती फारशी कमाई करू शकली नाही. तथापि, पूनम पांडे अनेकदा तिच्या न्यूड फोटो, व्हिडिओ आणि वादग्रस्त विधानांमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. आज पूनमच्या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात. पूनम पांडेने बॉलिवूड आणि टीव्हीमध्ये दिसण्यापूर्वी मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2011 मध्ये पूनमला कॅलेंडर गर्ल्स मॉडेल म्हणून ओळख मिळाली. त्याचवेळी पूनम काही मासिकांच्या कव्हर पेजवर दिसली. मनोरंजन जगात येण्यापूर्वी पूनम पांडे महाविद्यालयात अॅथलीट होती आणि तिने उंच उडी, रिले रेसमध्येही भाग घेतला होता. (वाचा - Poonam Pandey Hot Video: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिची 'अशी 'सेक्सी अदा पाहून चाहत्यांच्या उंचावल्या भुवया (Watch Video))
पूनम पांडे करिअर -
पूनम पांडे 2013 मध्ये आलेल्या नशा या चित्रपटात दिसली होती. पूनमच्या बोल्ड लूकमुळे या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. यानंतर पूनम द जर्नी ऑफ कर्मा, मालिनी एंड को आणि दिल बोले हडिप्पा यासारख्या चित्रपटांमध्ये दिसली. पण तिला फारस यश मिळालं नाही. छोट्या पडद्यावरही पूनम मेरी आशिकी तुमसे ही, नादानियां आणि फियर फैक्टर: खतरों के खिलाड़ी या शोमध्ये दिसली होती. परंतु इथेही तिला लक्षणीय यश मिळू शकलं नाही. (Poonam Pandey Sexy Photo: पूनम पांडे ने हनिमूनला आपल्या नव-याला सेक्ससाठी विचारला 'हा' Naughty प्रश्न, त्यावर सॅमने दिलेले हे उत्तर वाचून चाहतेही चक्रावले)
पूनम पांडे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर केललं विधान तसेच लग्नानंतरच्या काही काळानंतर तिचा पती सॅम बॉम्बेवर केलेले गंभीर आरोप. या संपूर्ण वादग्रस्त आरोप आणि वादामुळे पूनम नेहमीचं चर्चेत असते. या वादांव्यतिरिक्त पूनम पांडे अनेकदा आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे वादात राहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानते आदर्श नेता -
ऑक्टोबर 2015 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पूनम पांडे म्हणाली होती की, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आदर्श नेता मानते. त्यांना मी फॉलो करते. ते ज्याप्रमाणे लोकांना हाताळतात, त्यांची ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी मला खूप आवडते.
Today I turn 30!!!!!
My God, what a journey.
Thank you so much for loving me & dealing with me 😂
I will keep my journey alive for you guys 💋
I love you all ❤️
— Poonam Pandey Bombay (@iPoonampandey) March 11, 2021
पूनमने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या सोशल मीडिया अकाऊटवरून चाहत्यांचे आभार मानले आहेत. यात तिने लिहिलं आहे की, आज मी 30 वर्षांची होत आहे. माझ्यावर प्रेम करण्यासाठी तुमचे खूप आभार. मी माझा प्रवास तुमच्यासाठी असाच चालू ठेवेल. मी तुमच्यावर लाल हृदयावर नेहमी प्रेम करील.