Aftab Shivdasani Tests Negative for COVID-19: आफताब शिवदासानी ने केली कोरोनावर मात; चाहत्यांसाठी शेअर केला 'हा' अनुभव
आफताबचा कोरोना अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आफताबने आज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांच्या मनातील कोरोनासंदर्भातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टमध्ये आफताबने असं सांगितलं आहे की, केवळ 20 टक्के लोक असे आहेत, की ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे.
Aftab Shivdasani Tests Negative for COVID-19: बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी (Aftab Shivdasani) ने कोरोना विषाणूवर यशस्वीरित्या मात केली आहे. आफताबचा कोरोना अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आफताबने आज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांच्या मनातील कोरोनासंदर्भातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टमध्ये आफताबने असं सांगितलं आहे की, केवळ 20 टक्के लोक असे आहेत, की ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे.
आफताबने इंस्टाग्रामवर या संदर्भात माहिती देणारा एक फोटो पोस्ट केला असून त्याला 'ओम साईराम. अल्लाह मालिक,' असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमध्ये आफताबने म्हटलं आहे की, 'मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, देवाच्या कृपेने माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तुमच्या सर्वांनी दिलेल्या शुभेच्छासाठी धन्यवाद. कोरोना आराज बरा होऊ शकतो. केवळ 20 टक्के लोकांनाचं कोरोनाचा जास्त धोका आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे.' (हेही वाचा - Hathras Gangrape: हाथरस सामूहिक बलात्कार घटनेबाबत अभिनेता अक्षय कुमार ने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली नाराजी, म्हणाला दोषींना फाशी द्या)
View this post on Instagram
Grateful. ❤️✨🙏🏼 Om Sai Ram. Allah Malik.
A post shared by Aftab Shivdasani (@aftabshivdasani) on
पुढे आफताबने म्हटलं आहे की, बहुतेक कोरोना रुग्ण हे घरातचं औषध, गोळ्या घेऊन बरे होत आहेत. मी तुम्हाला विनम्रपणे आवाहन करतो की, कोरोना संकट जाईपर्यंत सर्वांनी मास्क, सॅनीटायझर आणि सोशल डिस्टेंसिंगचा अवलंब करावा.
दरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी आफताबने आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं होतं. अलीकडे देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्याला कोरोना विषाणूची लागण झाली असून यातील अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.