Paatal Lok Controversy: 'अनुष्का शर्माला घटस्फोट दे'! BJP आमदाराचा विराट कोहली याला अजब सल्ला

भारतीय जनता पक्षाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अनुष्का शर्माविरोधात वेब सीरिजमध्ये त्यांचे छायाचित्र संमतीशिवाय वापरल्याबद्दल एफआयआर दाखल केली आणि विराट कोहलीला अनुष्काला घटस्फोट देण्याचा अजब सल्ला दिला.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credit: Instagram)

अमेजन प्राइमच्या वेबवरील 'पाताल लोक' (Paatal Lok) या मालिकेवरील वाद सातत्याने वाढत आहे. 15 मे रोजी रिलीज झालेल्या या वेबसिरीजला यूजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला. वेब सीरिजला चाहत्यांकडून कौतुक होत असतानाही त्याने अनेक विवादांनाही जन्म दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नंदकिशोर गुर्जर (Nandkishore Gurjar) यांनी निर्माती आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्याविरोधात वेब सीरिजमध्ये त्यांचे छायाचित्र संमतीशिवाय वापरल्याबद्दल एफआयआर दाखल केली. या मालिकेत जातीय खळबळ उडवल्याबद्दल त्यांनी अनुष्काविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत तक्रार देखील दाखल केली आहे. या शोमध्ये जाती-संबंधी शब्द वापरण्यावर नेपाळी समाजाने आक्षेप घेतल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. शिवाय गुर्जर यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) अनुष्काला घटस्फोट देण्याचा अजब सल्ला दिला. (Paatal Lok: अनुष्का शर्मा च्या 'पाताल लोक' वेब सीरिजवर पती विराट कोहली ने दिली 'अशी' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट)

ते म्हणाले की अनुष्काने राजद्रोह केल्याने विराटने तिला घटस्फोट द्यावा. 'न्यूजरूम पोस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत गुर्जर ‘देशापेक्षा कोणीही मोठं असू शकत नाही. विराट कोहली आजवर देशासाठी खेळत आला आहे. त्याने देशाचे नाव मोठं केले आहे. तो देशभक्त आहे. मात्र, अनुष्का या वेबसीरिजची निर्माती असून तिनं अशाप्रकारे देशद्राहाचं काम केलं आहे त्यामुळे विराटने अनुष्काला तातडीने घटस्फोट द्यायला हवा."

दरम्यान, भाजप आमदाराने माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रही लिहिले असून वेब सीरिजच्या प्रवाहावर बंदी घालण्याची विनंती केली आहे. अनुष्काने अद्याप या बाबींवर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. 'पाताल लोक' वेबसिरीजने रिलीज झाल्यापासून अनेक वाद ओढवून घेतले आहेत. सर्वप्रथम गोरख समुदायाने त्यांच्या विरोधात तक्रार केली. यानंतर नंदकिशोर आणि सिक्कीमचे खासदार इंद्र हंग सुब्बा यांनहीही अनुष्काच्या चर्चित वेबसिरीजवर आक्षेप घेतला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif