संतापजनक! सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर बनवले भोजपुरी गीत; ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केला राग- ‘लाज विकली आहे की काय?’

14 जून रोजी बॉलीवूड अभिनेता, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आत्महत्या केल्याचे वृत्त आले होते. आज या गोष्टीला 4 दिवस उलटूनही सुशांतच्या मृत्युच्या धक्क्यातून अजूनही बरेचजण सावरले नाहीत. ही गोष्ट अनेक चाहत्यांच्या, लोकांच्या, इतर कलाकारांच्या इतकी जिव्हारी लागली आहे की, आता या आत्महत्येची कसून चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

14 जून रोजी बॉलीवूड अभिनेता, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आत्महत्या केल्याचे वृत्त आले होते. आज या गोष्टीला 4 दिवस उलटूनही सुशांतच्या मृत्युच्या धक्क्यातून अजूनही बरेचजण सावरले नाहीत. ही गोष्ट अनेक चाहत्यांच्या, लोकांच्या, इतर कलाकारांच्या इतकी जिव्हारी लागली आहे की, आता या आत्महत्येची कसून चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या सर्वात एक असंवेदनशील गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे, सुशांतच्या मृत्यूवर भोजपुरी भाषेत चक्क गाणे (Bhojpuri Song) बनवण्यात आले आहे. ‘सुशांत भैया फसरी लगा लिहले हे राम’, असे या गाण्याचे शब्द असून, मुनमुन बिहारी या व्यक्तीने हे गाणे गायले आहे.

सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाने बॉलिवूडसह भोजपुरी इंडस्ट्रीलाही धक्का बसला आहे. चित्रपट इंडस्ट्री सुशांतचे जाणे कधीच विसरणार नाही. सुशांत सिंहच्या मृत्यूमुळे भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीही (Rani Chhaterjee) दु: खी आहेत. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुशांतच्या मृत्यूबद्दल अनेक पोस्ट्स शेअर केल्या आहेत. आता राणीने या भोजपुरी गाण्याबद्दलही आपली चीड व्यक्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

क्या शर्म बेच खाई है इन लोगो ने या कसम खाए है ? जाहिल शर्म करो बंद करो. अपनी मेहनत से नाम कमाओ ना की किसी के मौत का फायदा उठा कर ... कलाकार के नाम पर धब्बा है ऐसे लोग अब देखो कोई भोजपुरी का एक्टर रिएक्ट नहीं करेगा ऐसे लोगो के वजह से जग हसाई होगी और हम शांत रहते है इसलिए इनका मन बढ़ रहा है ।#shamonyou

A post shared by Rani Chatterjee Official (@ranichatterjeeofficial) on

आपल्या पोस्टमध्ये राणी म्हणते, ‘या लोकांनी त्यांची लाज विकली आहे की काय? आहे? अशी घाणेरडी कामे करणे थांबवा. आपल्या मेहनतीने नाव कमवा, कोणाच्या मृत्यूचा फायदा घेऊन नाही. कलाकाराच्या नावावर एक डाग आहेत असले लोक. आता पहा, कोणताही भोजपुरी कलाकार याबाबत प्रतिक्रिया देणार नाही. अशा लोकांमुळे जगात हसे होईल व आम्ही शांत आहोत म्हणूनच अशा लोकांचे फावते.’ राणी चटर्जीने आपला राग व्यक्त करत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुशांत सिंह यांच्या मृत्यूवर बनविलेले गाणे दिसत आहे. सोशल मिडियावरही या गाण्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतला अखेरचा निरोप; गंगेत विसर्जित केल्या अस्थी (See Photo)

दरम्यान, सुशांतच्या मृत्युनंतर अनेक कलाकारांनी बॉलीवूडमधील घराणेशाहीचे सत्य लोकांसमोर मांडले आहे. नेपोटिझम (Nepotism) मुळे आलेल्या डिप्रेशनमध्ये सुशांतने आत्महत्या केली असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे आहे. आता जितेंद्र आव्हाड स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची भेट घेऊन सुशांतच्या मृत्युच्या चौकशीची मागणी करणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now