Best Bikini Look 2020: हॉट बिकनीतील 'या' बॉलिवूड सेलेब्सची संपूर्ण वर्षभर चर्चा, पहा येथे ग्लॅमरस फोटो
चित्रपटांचे चित्रिकरण ही ठप्प होण्यासह नवे चित्रपट ही प्रदर्शित झाले नाहीत. यामुळे सिनेसृष्टीला फार मोठा फटका कोरोना व्हायरसमुळे पडला आहे
Best Bikini Look 2020: यंदाचे वर्ष हे कोरोना व्हायरस आणि त्या संबंधित बातम्यांमध्येच अर्धे निघून गेले. चित्रपटांचे चित्रिकरण ही ठप्प होण्यासह नवे चित्रपट ही प्रदर्शित झाले नाहीत. यामुळे सिनेसृष्टीला फार मोठा फटका कोरोना व्हायरसमुळे पडला आहे. मात्र याच दरम्यान, चाहत्यांचे आपल्याकडे लक्ष आकर्षित करुन घेण्यासाठी बॉलिवूड सेलेब्सने मात्र काही कसरत सोडली नाही. घरात अडकलेल्या सेलेब्सने त्यांचे डेली अपडेट्ससह एखाद्या ठिकाणी प्रवास करत असल्याचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. अशातच आता कोरोनाच्या काळातच या काही सेलेब्सला फिरण्याचा मोह काही आवरलेला नाही. त्यांचे हॉट बिकनितील फोटो हे संपूर्ण वर्षभर चर्चेचा विषय ठरेल आहेत.
तर या हॉट, सेक्सी बिकनितील सेलेब्समध्ये दिशा पाटनी ते इलियाना डिक्रुज सारख्या अभिनेत्रींनी आपले फोटो सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. तर येथे पहा त्यांचे ग्लॅमरस बिकनीतील फोटोज.(Year Ender 2020: अभिषेक बच्चन, बॉबी देओल, सुष्मिता सेनसह या बॉलिवूड कलाकारांनी वेब सीरिजमध्ये केला डेब्यू, पाहा संपूर्ण यादी)
दिशा पाटनी
या लिस्टमध्ये सर्वात प्रथम नाव येते ते म्हणजे दिशा पाटनी हिचे. कारण नुकत्याच टायगर श्रॉफ याच्या सोबत दिशा मालदीव येथे गेली होती. तेथील फोटो सुद्धा तिने सोशल मीडियात पोस्ट केले होते. दिशाचा मालदीव मधील हॉट बिकनीतला अंदाच तिच्या चाहत्यांना फारच आवडला होता.
सारा अली खान
या लिस्टमधील दुसरे नाव म्हणजे सारा अली खान. मालदीव येथे भाऊ इब्राहिम सोबत सु्ट्टीची मजा घेताना सारा हिचा बिकनीतील सेक्सी लूक पाहून चाहत्यांना मोह आवरला गेला नाही. सोशल मीडियातील तिचा हा लूक प्रचंड चर्चेत राहिला होता.
काजल अग्रवाल
नुकत्याच लग्नाच्या बेड्यात अडकलेल्या काजल अग्रवाल हिचे फोटो समोर आले होते. त्यानंतर हे कपल हनिमूनसाठी मालदीव येथे गेले होते. त्यावेळी काजल हिचा बिकनीतील लूक पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
मौनी रॉय
बंगाली ब्युटी क्विन मौनी रॉय ही नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. मात्र तिचे बिकनीतील फोटो पाहिले असता त्यामध्ये तिचा सेक्सी अंदाज पाहण्याजोगे राहवत नाही.
इलियाना डिक्रूज
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज सुद्धा बिकनीतील सेलेब्स पैकी एक आहे.तिचे सोशल मीडियातील फोटो पाहून चाहत्यांनी त्यावर लाईक्ससह तिच्या या लूकबद्दल प्रतिक्रिया ही दिल्या आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे आता काही गोष्टी सुरु झाल्याने शूटिंग पुन्हा एकदा सुरु झाले आहे. तर नव्या वर्षात काही चित्रपट ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र अद्याप ओटीटी प्लॅटफॉर्मवरच चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत.