Asha Bhosle Birthday Special: सुरांची सम्राज्ञी आशा भोसले; जाणून घ्या त्यांचे विश्वविक्रम, पुरस्कार व काही रंजक माहिती

घरात त्यांचे वडिलच त्यांच्या गायनाचे गुरु होते. मात्र फसलेल्या पहिल्या लग्नाचे दुःख त्यांचे वाट्याला आले. त्यातूनही बाहेर पडून त्यांनी त्या काळी जिद्दीने नवीन सुरुवात केली आणि आज भारतातच नाही तर जगात नाव कमावले

आशा भोसले (फोटो सौजन्य-File Image)

भारतामध्ये फार कमी गायक असे आहेत ज्यांचे वय वाढत असते मात्र आवाजात काहीच फरक पडत नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांनी गाणी गायली तरी त्यांची गाणी एव्हरग्रीनच भासतात. यामध्ये सर्वात पहिला नंबर लागतो तो अशा भोसले (Asha Bhosle) यांचा. 1943 ते 2019 पर्यंत आशाजींनी हजारो गाणी गायली. लता मंगेशकरसारख्या गायिकेची बहिण असूनही आपली स्वतःची शैली, ओळख निर्माण केली. आज अशा या महान गायिकेचा वाढदिवस. 8 सप्टेंबर 1933 साली मंगेशकर कुटुंबामध्ये सांगली येथे आशा भोसले यांचा जन्म झाला. घरात त्यांचे वडिलच त्यांच्या गायनाचे गुरु होते. मात्र फसलेल्या पहिल्या लग्नाचे दुःख त्यांचे वाट्याला आले. त्यातूनही बाहेर पडून त्यांनी त्या काळी जिद्दीने नवीन सुरुवात केली आणि आज भारतातच नाही तर जगात नाव कमावले.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त चला पाहूया त्यांना मिळालेले पुरस्कार, विश्वविक्रम आणि त्यांचे यश

तर अशाप्रकारे आशा भोसले अजूनही चाहत्यांचा मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये जवळजवळ सर्व मोठ्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. 1980 साली त्यांनी पंचम दा म्हणजेच आर.डी.बर्मन यांच्यासोबत लग्न केले. गुलजार, पंचम दा आणि आशा भोसले हे त्रिकुट एकेकाळी यशाच्या उच्च शिखरावर होते.