सलमान खानला वाढदिवशी मिळाले अनमोल गिफ्ट; बहिण अर्पिता खान शर्माने दिला गोंडस मुलीला जन्म

आज सलमानला एक अनमोल गिफ्ट मिळाले आहे. सलमानची बहिण अर्पिताने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या 'गुड न्यूज'मुळे सलमानचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

(Arpita Khan Sharma blessed with baby girl Photo Credits: Instagram)

Arpita Khan Sharma Blessed with Baby Girl: बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) आज आपला 54 व्या वाढदिवस साजरा करत आहे. आज सलमानला एक अनमोल गिफ्ट मिळाले आहे. सलमानची बहिण अर्पिता खान शर्माने (Arpita Khan Sharma) आज एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या 'गुड न्यूज'मुळे सलमानचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

सलमानने 26 डिसेंबरला मध्यरात्री बॉलिवूड कलाकारांसाठी पार्टीच आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी अर्पिताही उपस्थित होती. आज अर्पिताने मुलीला जन्म दिला आहे, अर्पिताचा पती आयुष शर्माने यासंदर्भात माहिती दिली आहे. अर्पिताला आज सकाळी 8 च्या सुमारास हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.(हेही वाचा - सलमान खान 54व्या वाढदिवशी बनणार मामा! बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी 'असा' केलाय स्पेशल प्लॅन)

अर्पिता आणि आयुषचा 2014 मध्ये विवाह झाला होता. अर्पिता आणि आयुषला 3 वर्षांचा मुलगादेखील आहे. 2016 मध्ये आहिलचा जन्म झाला. सलमानने आपल्या सोशल मीडियावरून अनेकदा आहिलसोबत खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Welcoming our daughter into the world. Grateful & Overjoyed 🙏

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

अर्पिता आणि आयुषने सलमानला वाढदिवसानिमित्त एक हटके गिफ्ट द्यायचा प्लॅन केला होता. सलमानच्या वाढदिवसाला अर्पिता सी- सेक्शन डिलव्हरीने (C- Section Delivery) आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार होती. आज तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.