फुलांचा राजा गुलाबही फुलणार स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने; अर्जेंटीना येथील चाहत्याकडून हटके भेट
तसेच, त्या चाहत्यालाही धन्यवाद दिले आहेत.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोण ओळखत नाही? जगभरातील अनेक देशांच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या आवाजाचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे हे चाहते लता मंगेशकर यांच्यावर किती प्रेम करतात याचा अंदाज खुद्द लता मंगेशकर यांनाही कधी कधी येत नाही. म्हणूनच आपल्या चाहत्यांच्या प्रेमामुळे कधी कधी स्वत: ही स्वरसम्राज्ञीही भाराऊन जाते. अर्जेंटीना येथील सेंटियागो येथे राहणाऱ्या एका चाहत्याच्या प्रेमामुळे लता मंगेशकर अशाच भाराऊन गेल्या आहेत. ज्याची माहिती स्वत:लता मंगेशकर यांनीच ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
सेंटियागो येथील लता मंगेशर यांच्या चाहत्याने एका फुलाला लता मंगेशकर यांचे नाव देऊन सादर केले आहे. हे फुल आहे फुलांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबाचे. हा गुलाब नेहमीसारखा गुलाबी रंगाचा नाही. तर, तो चक्क निळ्या रंगाचा आहे. दिसायलाही हे फूल अगदीच हटके आणि तितकेच दुर्मिळही आहे. लता मंगेशर यांच्यापासून प्रेरणा घेतल्याने या फुलाला आपण लता मंगेशर यांचे नाव देत असल्याचे या चाहत्याचे म्हणने आहे. हा चाहता फूल विक्रिचा व्यवसायिक असल्याचे सांगितले जात आहे.
चाहत्याने दिलेली भेट पाहून लता मंगेशर यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करुन आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच, त्या चाहत्यालाही धन्यवाद दिले आहेत. (हेही वाचा, ... म्हणून लता मंगेशकर आयुष्यभर अविवाहित राहिल्या)
28 सप्टेंबर 1929 या दिवशी जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1942मध्ये केली. आतापर्यंत त्यांना मानाच्या समजल्या जाणाऱ्या भारत रत्न, पद्मभूषण, पद्म विभूषण, दादा साहेब फाळके, राजीव गांधी सद्भावना यांसारख्या अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या त्या 89 वर्षांच्या आहेत. मात्र, इतके वय होऊनही आजही त्याच्या आवाजातील जादू कायम आहे.