Sushant Singh Rajput Case: अंकिता लोखंडे चे शिबानी दांडेकर ला सडेतोड उत्तर, '2 सेकंदाचे फेम' कमेंट्सवर दिली 'ही' प्रतिक्रिया
केवळ 2 सेकंदाच्या प्रसिद्धीसाठी ती हे सर्व करत असल्याचे शिबानीने म्हटले आहे. यावर अंकिता लोखंडे हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन प्रत्युत्तर दिले आहे. आपल्याला टीव्ही अभिनेत्री म्हणून ओळखले जाते म्हणून शिबानी आपल्याबद्दल असे बोलली असे तिने म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) याच्या संशयित मृत्यूप्रकरणात न्यायाची मागणी करत सडेतोड वक्तव्य करणा-या अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) विरोधात अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हिने जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे. केवळ 2 सेकंदाच्या प्रसिद्धीसाठी ती हे सर्व करत असल्याचे शिबानीने म्हटले आहे. यावर अंकिता लोखंडे हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन प्रत्युत्तर दिले आहे. आपल्याला टीव्ही अभिनेत्री म्हणून ओळखले जाते म्हणून शिबानी आपल्याबद्दल असे बोलली असे तिने म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये 'माझ्याबद्दल वापरण्यात आलेल्या 2 सेकंदाचे फेम' या शब्दाने मला विचार करायला भाग पाडले आहे. 2004 साली टीव्हीवर आलेल्या झी सिने स्टार की खोज या कार्यक्रमातून माझ्या करिअरला सुरुवात झाली. मात्र मला खरी ओळख 2009 साली 'पवित्र रिश्ता' या कार्यक्रमातून मिळाली. प्रसिद्धी ही तुम्हाला चाहत्यांकडून मिळते. मी चाहत्यांसोबत तशी जोडली गेली आहे. ज्याचा परिणाम मला मणिकर्णिका आणि बागी 3 मध्ये काम करायला मिळाले.
त्याचबरोबर 'मी माझ्या मित्रासाठी न्याय मागत आहे तर मला 2 सेकंदासाठी प्रसिद्धी मिळवणारी असे बोलले जात आहे. कारण मी बॉलिवूडमध्ये नाही तर टीव्हीवर काम केले आहे. मात्र टेलीव्हिजनसाठी आम्ही कलाकार तितकीच मेहनत करतो जितके की चित्रपटांसाठी.' असंही ती पुढे म्हणाली.
या पोस्टला करणवीर बोहरा, दलजीत कौर, अमृता खानविलकर, निकेतन धीर सारख्या अनेक कलाकारांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला समर्थन दिले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)