Sandhya Theatre Stampede Case: हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या बाऊन्सरला अटक; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

संध्या थिएटर चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा अल्पवयीन मुलगा गंभीरपणे जखमी झाला. थिएटरमधील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यात अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते थिएटरमध्ये जाताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओंमध्ये, त्याचे बाउंसर गर्दीला धक्काबुक्की करताना आणि बाहेर ढकलताना दिसत आहेत.

Sandhya Theatre Stampede Case: हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनच्या बाऊन्सरला अटक; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Sandhya Theatre Stampede Case (फोटो सौजन्य - X/@InformedAlerts)

Sandhya Theatre Stampede Case: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) चा बाउन्सर (Allu Arjun's Bouncer) अँथनी याला मंगळवारी हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी (Sandhya Theatre Stampede Case) अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 प्रीमियर कार्यक्रमासाठी बाऊन्सर्सची टीम आयोजित केल्याचा आणि चाहत्यांना थिएटरच्या बाहेर ढकलल्याचा आरोप आहे. या कारमामुळे थिएटरबाहेर चेंगराचेंगरी वाढली.

चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू -

संध्या थिएटर चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा अल्पवयीन मुलगा गंभीरपणे जखमी झाला. थिएटरमधील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यात अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते थिएटरमध्ये जाताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओंमध्ये, त्याचे बाउंसर गर्दीला धक्काबुक्की करताना आणि बाहेर ढकलताना दिसत आहेत. (हेही वाचा -हैदराबाद पोलिसांनी Allu Arjun विरोधात आणखी एक नोटीस केली जारी, मंगळवारी होणार चौकशी)

बाउंसर गर्दीला धक्काबुक्की करताना - 

मंगळवारी अल्लू अर्जुनची हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. अभिनेता सकाळी 11 च्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचला. संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी त्याची जवळपास चार तास चौकशी केली. चौकशीदरम्यान, अभिनेत्याने त्याच्या आगमनाची माहिती थिएटर मालकांना दिली होती का? त्याने त्याच्या भेटीपूर्वी पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून परवानगी मागितली होती का? तसेच त्याने इतर अनिवार्य सार्वजनिक प्रोटोकॉलचे पालन केले होते का? असे प्रश्न विचारण्यात आले होते. (हेही वाचा -Pushpa2 Box Office Collection: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ने तिसऱ्या वीकेंडला 50 कोटींचा टप्पा केला पार, एकूण कलेक्शन 692.50 कोटी रुपये)

चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक -

अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरीप्रकरणी 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. एक रात्र कारागृहात घालवल्यानंतर त्याला जामिन मंजूर करण्यात आला आणि तो दुसऱ्या दिवशी घरी परतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सांगितले की, या प्रकरणामुळे आणि त्यानंतरच्या अटकेमुळे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्ररकरणातील पीडित कुटुंबाला अभिनेत्याने 25 लाख रुपये दिले आहेत. तसेच आता व्हेंटिलेटरवर असलेल्या अल्पवयीन मुलाचा वैद्यकीय खर्च उचलण्याचेही अभिनेत्याने आश्वासन दिले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2024 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).