Alia Bhatt-Ranbir Kapoor Baby: आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्यानंतर शेअर केली पहिली इंस्टाग्राम पोस्ट; म्हणाली, आम्ही भाग्यवान आहोत

या पोस्टमध्ये सिंह-सिंहिणी आणि शावक यांचे एक कार्टून आहे.

Alia Bhatt shares Instagram post after delivery (PC - Instagram)

Alia Bhatt-Ranbir Kapoor Baby: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या घरात आज मोठी खुशखबरी आली आहे. या जोडप्याच्या घरी एक छोटी परी आली आहे. ही बातमी समोर आल्यामुळे या जोडप्याचे चाहते आणि मित्रमंडळी खूप खूश आहेत. चाहते सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करत आहेत. दरम्यान, आलिया भट्टनेही एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे.

आलिया भट्टने काही वेळापूर्वी एक इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिंह-सिंहिणी आणि शावक यांचे एक कार्टून आहे. या पोस्टवर लिहिलं आहे की, आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी. आमचे बाळ आले आहे. ती मुलगी असून हे पूर्णता जादूई आहे. आम्ही प्रेमाने परिपूर्ण आहोत, भाग्यवान आहोत आणि पालक झालो आहोत. आलिया आणि रणबीरचे खूप प्रेम. (हेही वाचा - Alia-Ranbir Baby Girl: कपूर कुटुंबात आली छोटी परी; आलिया भट्टने दिला गोंडस मुलीला जन्म)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलियाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. तर दुसरीकडे आलिया 'जी ले जरा'मध्ये कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सर्व प्रोजेक्ट्सशिवाय आलिया भट्ट 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे. त्याचबरोबर एसएस राजामौली यांच्या SSMB29 चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे.

रणबीर कपूरचे आगामी प्रोजेक्ट्स -

रणबीरच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो ब्रह्मास्त्रापूर्वी शमशेरामध्ये दिसला होता. रणबीरच्या खात्यात लव रंजन दिग्दर्शित श्रद्धा कपूरसोबतच्या चित्रपटाचा समावेश आहे. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. त्याचबरोबर रणबीर कपूरही 'अॅनिमल' या चित्रपटात आपला ठसा उमठवताना दिसणार आहे. रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना अॅनिमलमध्ये दिसणार आहेत.