'मैदान' चित्रपटातील अजय देवगणचा लुक व्हायरल; 'बदल घडवण्यासाठी एकटाच पुरेसा' म्हणत शेअर केले पोस्टर
अजय देवगणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटातील लुक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजय देवगण एका हातात छत्री आणि बॅग घेऊन फुटबॉलला किक करताना दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना अजयने 'बदल आणण्यासाठी एकटाच पुरेसा आहे,' असं कॅप्शन लिहलं आहे. हा चित्रपट 27 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgan) 'मैदान' चित्रपटातील (Maidan Movie) फस्ट लुक (First Look) व्हायरल झाला आहे. अजय देवगणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटातील लुक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अजय देवगण एका हातात छत्री आणि बॅग घेऊन फुटबॉलला किक करताना दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना अजयने 'बदल आणण्यासाठी एकटाच पुरेसा आहे,' असं कॅप्शन लिहलं आहे. हा चित्रपट 27 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
'मैदान' चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉलचा महान कोच सय्यद अब्दुल रहीमची (Syed Abdul Rahim) भूमिका साकारत आहे. 1951 ते 1962 च्या काळाला भारतीय फुटबॉलचे सुवर्ण युग मानले जाते. 1956 च्या मेलबर्न ओलम्पिक खेळांमध्ये भारताने चौथे स्थान मिळवले होते. हे भारतीय फुटबॉल टीमचे सर्वात मोठे यश होते. अजयचा हा चित्रपट फुटबॉलच्या त्या सुवर्ण काळावर आधारित असणार आहे. (हेही वाचा - NRC मुद्द्यावरुन राखी सावंत हिने दिला चाहत्यांना 'हा' सल्ला, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Video))
या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत अभिनेत्री कीर्ती सुरेश दिसणार आहे. तसेच बोनी कपूर, आकाश चावला आणि अरूणा जॉय सेनगुप्ता या तिघांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा करणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगु आणि मल्याळम या 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.