Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरची लोकप्रियता झाली कमी; सोशल मीडियावर 5 लाख युजर्संनी केलं अनफॉलो
सुशांतने नेपोटिझमला (Nepotism) कंटाळून आपलं जीवन संपवलं, असा आरोपही अनेकांनी केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरची (Karan Johar) लोकप्रियता (Popularity) कमी झाली आहे. तसेच सोशल मीडियावर करण जोहरला 5 लाख युजर्संनी अनफॉलो (Unfollow) केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. सुशांतने नेपोटिझमला (Nepotism) कंटाळून आपलं जीवन संपवलं, असा आरोपही अनेकांनी केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरची (Karan Johar) लोकप्रियता (Popularity) कमी झाली आहे. तसेच सोशल मीडियावर करण जोहरला 5 लाख युजर्संनी अनफॉलो (Unfollow) केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने सुशांतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर भाष्य केलं होतं. सुशांतने नेपोटिझमला कंटाळू आत्महत्या केली, असा आरोपदेखील कंगनाने केला होता. यावेळी तिने थेट करण जोहरवर टिका केली होती. करण जोहरने कधीचं सुशांतला आपल्या पार्ट्यांना बोलावलं नाही. करण जोहरसारख्या मुव्ही माफियांमुळे इंडस्ट्रीतील अनेकांवर अन्याय होत आहे, असंही कंगनाने म्हटलं होतं. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा उत्सव होतो पण... 'सामना'च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी विचारले 'हे' प्रश्न)
कंगना राणावतच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट करण जोहर’चा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. त्यानंतर अनेक युजर्संनी करणला सोशल मीडियावर अनफॉलो केलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर करण जोहरची लोकप्रियता कमी होताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सुमारे 5 लाख लोकांनी त्याला अनफॉलो केलं आहे.
याअगोदर इन्स्टाग्रामवर करण जोहरचे 1 कोटी 10 लाख फॉलोअर्स होते. परंतु, सुशातं सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली आहे. करण जोहरबरोबर आलिया भट, सलमान खान आदी कलाकारांच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली आहे. परंतु, कंगना राणावतने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर सडेतोड टिका केल्याने तिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.