Shilpa Shetty Performs kanya Puja: नवरात्रात अष्टमीच्या निमित्ताने अभिनेत्री शिल्पा शेट्टीने केली कन्या पूजा; 9 मुलींचे पाय धुवून केली त्यांची पूजा (Watch Video)
या दिवसाला दुर्गा अष्टमी देखील म्हणतात. आज देशभरातील भक्त देवी महागौरीची पूजा करतात. यासह अनेक ठिकाणी कन्या पूजनही (kanya Puja) करण्यात येते.
आज 24 ऑक्टोबर, नवरात्रीचा (Navratri) आठवा दिवस. या दिवसाला दुर्गा अष्टमी देखील म्हणतात. आज देशभरातील भक्त देवी महागौरीची पूजा करतात. यासह अनेक ठिकाणी कन्या पूजनही (kanya Puja) करण्यात येते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. आजच्या दिवसाचे औचित्य साधून बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) देखील भक्तिमय वातावरणात देवीची पूजा करताना, कन्या पूजन करताना दिसली. आज शिल्पा शेट्टीने 9 मुलींची पूजा केली. यंदाची नवरात्री, कन्यापूजा शिल्पा शेट्टीची मुलगी शमिषासाठीही खूप खास होती.
शिल्पा शेट्टीने तिच्या घरी अष्टमीची पूजा घातली होती. शमिषाची ही पहिलीच नवरात्री असल्याने शिल्पाने तिचीही पूजा केली. शिल्पाच्या संपूर्ण पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना शिल्पा लिहिते, ‘आज, अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर, आम्हाला आशीर्वाद म्हणून आमची स्वतःची देवी शमिषा मिळाली. ही तिची पहिली नवरात्र आहे, म्हणून कन्या पूजा केली. तसेच कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून इतर 8 मुलींचीही पूजा केली.’ (हेही वाचा: दस-याच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन उत्साहात साजरी करा यंदाची विजयादशमी!)
पहा व्हिडिओ -
या व्हिडिओमध्ये प्रथम देवीची मूर्ती आणि तिच्या सभोवतालची सजावट दर्शवली आहे. त्यानंतर शिल्पाची मुलगी शमीषाचे पाय दिसतात, ज्याची कुंकू लाऊन शिल्पा पूजा करताना दिसत आहे. याशिवाय शिल्पाने इतर आठ मुलींचे पाय धुतले आणि त्यांना जेवण दिले. यानंतर पुजेची थाळी सजवून सर्व मुलींची पूजा केली. शिल्पाच्या या व्हिडिओमध्ये तिची बहीण शमिता शेट्टी आणि शिल्पाचा पती राज कुंद्रादेखील दिसत आहे.
याआधी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्र मोठ्या भक्तीने सण-उत्सव साजरे करता दिसले आहेत. त्यांनी गणेशोत्सवही मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. दरम्यान, शिल्पा शेट्टी लवकरच 'हंगामा 2' आणि 'निकम्मा'च्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.