कंगना रनौत आणि पत्रकारामध्ये जोरदार भांडण, 'जजमेंटल है क्या' सिनेमाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ (Watch Video)
कंगना रनौत हिने जजमेंटल है क्या सिनेमाच्या पत्रकार परिषदेदरम्यान पीटीआय वृत्तसंस्थेचा पत्रकार जस्टिन राव याच्यासोबत जोरदार भांडण केलं. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बॉलिवूड क्वीन (Queen) कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच आपल्या रोखठोक बोलण्यावरून चर्चेत असते. दिग्दर्शक करन जोहर (Karan Johar) सोबत नेपोटीझम वरून भांडण असो वा ह्रितिक रोशन (Hrithik Roshan) सोबत कथित प्रेमकरणावरून झालेली लढाई, कंगनाच्या भांडणाचे किस्से इंडस्ट्रीत सर्वांच्या परिचयाचे आहेत. पण यावेळेस कंगनाने एका पत्रकारासोबत पंगा घेतला आहे. तिचा आगामी चित्रपट जजमेंटल है क्या (Judgemental Hai Kya) च्या पत्रकार परिषदेदरम्यान पीटीआय वृत्तसंस्थेचा पत्रकार जस्टिन राव (Justin Rao) याच्यासोबत कंगनाचं जोरदार भांडण झालं. जस्टिनने मणिकर्णिका (Manikarnika) सिनेमाच्या प्रदर्शनावेळी तिच्या विरुद्ध काहीशी बातमी केली होती, ही बाब लक्षात येताच तिने त्याच्यावर आरोप लावायला सुरवात केली. या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 'Judgementall Hai Kya' Official Trailer: वेडेपणाच्या सोंगाआड मर्डर मिस्ट्री सांगणारा कंगना आणि राजकुमारचा 'Judgementall Hai Kya' चा ट्रेलर प्रदर्शित
जजमेंटल है क्या हा सिनेमाची पत्रकार परिषद काल मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळेस पत्रकार जस्टिनने प्रश्न विचारण्यासाठी आपले नाव सांगितले, त्याचे नाव ऐकताच कंगनाचा पारा चढला आणि तिने त्याला ऐकवायला सुरुवात केली, मणिकर्णिका सिनेमाच्या दरम्यान जस्टिन आपल्यासोबत तीन तास व्हॅनिटी व्हॅन मध्ये होता आपल्याशी बोलून त्याने सोबत जेवणही केले होते, मात्र त्यानंतरही त्याने मुद्दाम सिनेमाविषयी वाईट बातमी करून खोटं लिहिलं असा आरोप कंगनाने केला होता, यावेळेस जस्टिनने मात्र तिचे सगळे आरोप फेटाळून असं काहीच झालं नव्हतं, आणि पत्रकार म्हणून जे काही लिहिलं होतं ते अगदी बरोबर होतं असं म्हंटल, तसेच कंगनाने आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी आपल्या ट्विट किंवा मॅसेजचा स्क्रीनशॉट दाखवावा अशीही त्याने मागणी केली.
व्हायरल होत आहे कंगना राणावतचा 'तो' सेमीन्यूड फोटो; पहलाज निहलानी यांच्या फोटोशूटचा असल्याचा दावा
कंगना आणि पत्रकारामध्ये कडाक्याचे भांडण (Watch Video)
दरम्यान हा वाद वाढत गेल्यावर, कार्यक्रमाच्या निवेदकाने मध्यस्थी केली मात्र तिथे असलेल्या एका दुसऱ्या पत्रकाराने त्याला तू शांत बस असे सांगून गप्प केले, अखेरीस सिनेमाची निर्माती एकता कपूर हिने कंगनाला शांत करत वाद थांबवला
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)