Viral Video: मुंबईत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक संमेलन सोहळ्यात अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत या कलाकारांनी केला 'Deewangi Deewangi' गाण्यावर डान्स, पहा अबरामचा क्यूट डान्स
वार्षिक कार्यक्रमात, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, सुहाना खान, करण जोहर आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी 'Deewangi Deewangi' गाण्यावर ठेवा धरला.
Viral Video: 15 डिसेंबर रोजी, बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. वास्तविक धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (Dhirubhai Ambani International School) ने 15 डिसेंबर रोजी आपला वार्षिक सोहळा साजरा केला. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती लावली. कारण त्यांची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. वार्षिक दिनाला बच्चन कुटुंब, शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब, करीना कपूर खान, करण जोहर, शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसह इतरांनी हजेरी लावली होती. तारांकित वार्षिक कार्यक्रमात, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, सुहाना खान, करण जोहर आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी 'Deewangi Deewangi' गाण्यावर ठेवा धरला. तथापि, या कार्यक्रमात सर्वाचे लक्ष शाहरुख खानच्या अबरामने वेधून घेतले. अबरामने मनमोहक नृत्य करत सर्वांची मनं जिंकली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Most Anticipated Films in 2024: रोमान्स, कॉमेडी आणि अॅक्शनने भरलेले असले वर्ष 2024; हे 7 चित्रपट पुढील वर्षी बॉक्स ऑफिसवर धमाल करायला तयार, घ्या जाणून)
पहा व्हिडिओ -
#AmitabhBachchan, #AbhishekBachchan, #ShahRukhKhan, #Suhana, #AishwaryaRai, #KaranJohar and many celebrities dance to the tunes of 'Deewangi Deewangi' at the annual day function... Details for the cuteness of #AbRam dancing 🫢😍#Dunki #DunkiAdvanceBooking #DunkiFirstDayFirstShow pic.twitter.com/E9SeQJwJiq
— SRKajol🇧🇷 (@SRKajolBrasil) December 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2023 09:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

