सोनू सूद याला मिळाली मोठी जबाबदारी, पंजाबमध्ये कोरोना लसीकरण कॅम्पेनच्या ब्रँन्ड अ‍ॅम्बेसेटरसाठी निवड

अशातच आता देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून वेगाने रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी संचारबंदीसह लॉकडाऊन सुद्धा लागू करण्यात आला आहे.

सोनू सूद आणि पंजाब मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Photo Credits-Twitter)

जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून वेगाने रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी संचारबंदीसह लॉकडाऊन सुद्धा लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर पंजाब (Punjab) मध्ये लसीकरणावर अधिक जोर दिला जाऊ लागला आहे. यासाठी बॉलिवूड मधील अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याला पंजाबमध्ये लसीकरणासाठी ब्रँन्ड अॅम्बेसेटर म्हणून निवडण्यात आले आहे.(Sonu Sood च्या नावाने फसवणूक करणाऱ्याला अटक; अभिनेत्याने फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सतर्कतेचा इशारा)

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज सोनू सूद सोबत भेट घेतल्यानंतर त्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोनू सूदला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलावले होते. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले की, सोनू सूद सारखा अन्य कोणीही रोल मॉडेल असू शकत नाही. जो लोकांना कोरोना लस घेण्यसाठी प्रोत्साहित करु शकतो. पंजाबमध्ये कोरोनाची लस घेण्यासंदर्भात लोकांमध्ये शंका आणि भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.(सध्याच्या कठीण काळात परीक्षा घेणे Unfair; Sonu Sood ने व्हिडिओ शेअर करत मांडली भूमिका Watch Video)

Tweet:

त्यांनी असे म्हटले की, गेल्या वर्षात ज्या प्रकारे सोनू सूद याने प्रवाशांना मदत केली आणि त्यांचा विश्वास जिंकला होता. त्याचप्रमाणे या लसीकरणाच्या कॅम्पेनसाठी सुद्धा तो यशस्वी ठरेल. जेव्हा सोनू येथील नागरिकांना लस घेण्यासंदर्भात सांगेल तेव्हा नागरिक जरुर त्याच्यावर विश्वास ठेवतील.अभिनेता सोनू सूदने या नव्या जबाबदारीसाठी आनंद व्यक्त केला आहे. त्याने असे म्हटले की, या मोठ्या कॅम्पेनमधील माझी कोणतीही भुमिका साकारुन आपल्या राज्यातील लोकांचे जीव वाचवण्याच्या कार्यात मला स्वत:ला धन्य वाटेल.