श्रेयस तळपदे बनला अल्लू अर्जूनचा आवाज, अभिनेत्याने शेअर केला 'Pushpa The Rise' चा हिंदीतील ट्रेलर
यामध्ये अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळणार आहे.
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) अपकमिंग सिनेमा 'पुष्पा द राइज'चा (Pushpa The Rise) ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना सिनेमाचा ट्रेलर पसंदीस पडला असून त्यामधील अल्लू अर्जूनच्या अभिनयामुळे त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. पुष्पा द राइज पॅन इंडियाचा पहिला प्रोजेक्ट असून जो दक्षिण भाषांव्यतिरिक्त हिंदीत प्रदर्शित केला जाणार आहे.
सिनेमाचा हिंदीत ट्रेलर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. अशातच अल्लू अर्जून याचा आवाज मराठी -बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याने दिला आहे. श्रेयस याने आपल्या ट्विटवर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करत असे लिहिले की, भारतातील सर्वाधिक शक्तीशाली आणि स्टाइलिश अभिनेत्याचा आवाज बनल्याने अत्यंत खुश आणि सन्मानित @alluarjun 'पुष्पा' हिंदीत. पोस्टर शेअर करत पुष्पाचा हिंदी ट्रेलर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे.(Pushpa - The Rise Trailer Release: अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा' सिनेमाचा ट्रेलर प्रर्दर्शित, सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला)
Tweet:
या सिनेमा मध्ये प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शनसह रोमांस सुद्धा पहायला मिळणार आहे. रश्मिका आणि अल्लू अर्जुन प्रथमच एकत्रितपणे दिसून येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री आता मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता लागली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केला असून त्यांनी यापूर्वी ही अल्लू अर्जुन याच्यासोबत काम केले आहे. त्यांनी अल्लू अर्जुनसह आर्या, आर्या-2 सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.