Actor Akshat Utkarsh Dies: बिहारचा रहिवासी असलेला बॉलिवूड अभिनेता अक्षत उत्कर्ष चा मुंबईमध्ये मृत्यू
असं असतानाचं आता बिहारच्या (Bihar) आणखी एका अभिनेत्याचा मुंबईमध्ये (Mumbai) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षत उत्कर्ष (Akshat Utkarsh) नावाच्या अभिनेत्याचा मुंबईमध्ये मृत्यू झाला आहे. अक्षतच्या कुटुंबियांनी त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये राहणाऱ्या अक्षत उत्कर्षचा मुंबईमध्ये मृतदेह सापडला आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाची योग्य दखल घेत नसल्याचा आरोपदेखील अक्षतच्या कुटुंबियांनी केला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंददेखील केली नसल्याचे कुटुंबियांनी म्हटलं आहे.
Bollywood Actor Akshat Utkarsh Dies: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे. असं असतानाचं आता बिहारच्या (Bihar) आणखी एका अभिनेत्याचा मुंबईमध्ये (Mumbai) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षत उत्कर्ष (Akshat Utkarsh) नावाच्या अभिनेत्याचा मुंबईमध्ये मृत्यू झाला आहे. अक्षतच्या कुटुंबियांनी त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये राहणाऱ्या अक्षत उत्कर्षचा मुंबईमध्ये मृतदेह सापडला आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाची योग्य दखल घेत नसल्याचा आरोपदेखील अक्षतच्या कुटुंबियांनी केला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंददेखील केली नसल्याचे कुटुंबियांनी म्हटलं आहे.
न्यूज 18 इंडियाच्या बातमीनुसार अक्षतच्या मामाने सांगितले की, अक्षतने रविवारी रात्री 9 वाजता आपल्या वडिलांशी चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर रात्री उशिरा त्याच्या मृत्यूची बातमी समजली. अक्षतच्या मामानेदेखील मुंबई पोलिसांनी मदत न केल्याचा आरोप केला आहे. अक्षतचं पार्थिव पटना येथे आणण्यात आलं आहे. (हेही वाचा - Bollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त)
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. सुशांतच्या कुटुंबियाकडून त्याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सध्या सीबीआयकडून सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज एंगलची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना समन्स बजावले आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून आतापर्यंत दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्वांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. दरम्यान, बिहारमधील आणखी एका अभिनेत्याचा मुंबईत मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियाकडून त्याच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.