Abhishek Bachchan चा कबड्डी संघ जिंकला, Amitabh Bachchan यांनी सून Aishwarya Rai सोबत साजरा केला आनंद, Watch Video
जयपूर पिंक पँथर्स संघाला (Jaipur Pink Panthers Team) सपोर्ट करण्यासाठी अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबासह स्टेडियममध्ये पोहोचला. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन अभिषेकसोबत स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या पिंक पँथर्सला चिअर करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
Abhishek Bachchan's Kabaddi Team Wins: बच्चन कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) चे सासरच्यांसोबत मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु, आता ऐश्वर्या राय तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासह पती अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) च्या टीमला चीअर करताना दिसली. शनिवारी मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियमवर कबड्डीचा सामना (Kabaddi Match) झाला. जयपूर पिंक पँथर्स संघाला (Jaipur Pink Panthers Team) सपोर्ट करण्यासाठी अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबासह स्टेडियममध्ये पोहोचला. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन अभिषेकसोबत स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या पिंक पँथर्सला चिअर करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
स्टार स्पोर्ट्सने या सामन्याचा व्हिडिओ मायक्रोब्लॉगिंग साइट X (ट्विटर) वर शेअर केला आहे. क्लिपमध्ये, ऐश्वर्या, अमिताभ, आराध्या आणि अभिषेक पिंक पँथर्सचे टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंब तल्लीन होऊन सामना पाहत होते. कधी वातावरण तणावपूर्ण तर कधी सगळे आनंदी असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहेत. (हेही वाचा -बॉलिवूड कपल Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan घेणार घटस्फोट? दोघांचे नाते बिनसल्याची सोशल मिडियावर चर्चा)
शेवटी पिंक पँथर्सच्या विजयाने संपूर्ण कुटुंब आनंदाने उड्या मारू लागले. बच्चन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद स्पष्ट दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे शेअर करत स्टार स्पोर्ट्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मुंबई लीगच्या पहिल्या गेममध्ये जयपूर पिंक पँथर्सचा विजय पाहण्यासाठी अमिताभ, ऐश्वर्या आणि अभिषेक उपस्थित होते.' (हेही वाचा - Amitabh Bachchan Unfollow Aishwarya Rai Bachchan? अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल? काय आहे सत्य? जाणून घ्या)
पहा व्हिडिओ -
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायचे सासरच्यांसोबत वाद सुरू असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. मात्र, या बातम्यांनंतर अमिताभ आणि ऐश्वर्याने आराध्याच्या वार्षिक उत्सवाला एकत्र हजेरी लावली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)