Aamir Khan Announces Divorce: आमिर खान-किरण राव यांच्या नात्याला ब्रेक, 15 वर्षानंतर घेणार घटस्फोट
या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून आता त्यांचा घटस्फोट होणार आहे.
Aamir Khan Announces Divorce: अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी त्यांच्या 15 वर्षाच्या नात्याला आता ब्रेक दिला आहे. या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून आता त्यांचा घटस्फोट होणार आहे. हे दोघेजण आता स्वतंत्र आयुष्य जगणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेल्या एका संयुक्त विधानात म्हटले आहे. ही बाब चाहत्यांना धक्का देणारी असल्याने सर्वांच्या आता भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या विधानात असे म्हटले आहे की, या 15 वर्षाच्या सुंदर वर्षात आम्ही एकत्रित आयुष्यभराचे अनुभव, आनंद एकमेकांसोबत शेअर केले आहेत. आमचे नाते फक्त विश्वास, सम्मान आणि प्रेमापेक्षा अधिक आहे. आम्ही आता आमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरु करु पाहत आहोत. पती-पत्नीच्या रुपात नव्हे तर को-पॅरेंट्स आणि परिवाराच्या रुपात. आम्ही काही काळापूर्वीच एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.(Mandira Bedi हिचे पती Raj Kaushal यांचं निधन)
Tweet:
त्यांनी पुढे असे म्हटले की, आम्ही दोघांनी वेगळे होण्याव्यतिरिक्त आमच्या आयुष्यात एक विस्तारित परिवाराप्रमाणे शेअर करणार आहे. आम्ही आमचा मुलगा आजाद यासाठी आम्ही को-पॅरेंट म्हणून काळजी घेणार आहोत. आम्ही सिनेमा, पानी फाउंडेशन आणि अन्य योजनेत सुद्धा एकत्रित रुपात काम करणे सुरुच ठेवणार आहे.
आमच्या नात्यात निरंतर समर्थन आणि विचारासाठी आमचा परिवार आणि मित्रांचे खुप आभार. त्यांच्यामुळे आम्ही हे सुरक्षित पाऊल उचलू शकलो. आम्ही आमच्या शुभचिंतकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची अपेक्षा करतो. अशी आशा आहे की, आमच्याप्रमाणे तुम्ही सु्द्धा आमचा घटस्फोट हा एका नव्या प्रवासासारखा पहावा. धन्यवाद आणि प्रेम, किरण आणि आमिर.
दरम्यान, आमिर खान आणि किरण राव यांची भेट चित्रपट लगान वेळी झाली होची. या दोघांनी 28 सप्टेंबर 2005 मध्ये विवाह केला. सरोगेसीच्या मदतीने त्यांनी मुलगा आजाद याला जन्म दिला. 15 वर्षानंतरच्या या विवाहानंतर किरण आणि आमिर यांनी चढउतार पहिले आहे. किरण पूर्वी आमिर खान याने रीना दत्ता हिच्या सोबत लग्न केले होते.