Tanhaji: The Unsung Warrior मध्ये तानाजीचा चुकीचा वंश दाखवला; कोर्टात याचिका दाखल; 19 डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी

चित्रपटामध्ये ऐतिहासिक तथ्यांच्याबाबत फेरफार केला असल्याचा आरोप केला गेला आहे. चित्रपटामध्ये तानाजीचा मूळ वंश वेगळाच दाखवण्यात आला असून

Ajay Devgn in Tanhaji The Unsung Warrior (Photo Credits: Twitter)

अजय देवगणचा (Ajay Devgan) बहुप्रतीक्षित आणि महत्वक्षांशी चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ (Tanhaji: The Unsung Warrior) येऊ घातला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यानंतर गाणी प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढली आहे. मात्र इतर ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटामध्ये ऐतिहासिक तथ्यांच्याबाबत फेरफार केला असल्याचा आरोप केला गेला आहे. चित्रपटामध्ये तानाजीचा मूळ वंश वेगळाच दाखवण्यात आला असून, तानाजीची खरी वंशावळ दर्शविण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. असे घडेल नाही, तर चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्यासाठी कोर्टाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ला निर्देश द्यावेत असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघ (Akhil Bhartiya Kshatriya Koli Rajput Sangh) यांनी ही दाखल केली आहे. या याचिकेमध्ये असा आरोप केला आहे की, चित्रपटाचे निर्माते हे तानाजी मराठा समाजातील असल्याचे खोटे सांगत आहे, ते मराठा नसून क्षत्रिय महादेव कोळी होते. या याचिकेबाबत दिल्ली उच्च न्यायालयात 19 डिसेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे. या चित्रपटामध्ये राजकीय आणि व्यावसायिक लाभ घेण्यासाठी मुद्दाम तानाजीचा खरा वंश दाखवण्यात आला नाही असेही कोळी राजपूत समाजाचे म्हणणे आहे. 10 जानेवारी, 2020 रोजी हा चित्रपट पडद्यावर येणार आहे. (हेही वाचा: Tanhaji Marathi Trailer: 'अ‍जय देवगण' ची मुख्य भूमिका असलेल्या तानाजी सिनेमाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला

तान्हाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटात मराठा सरदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे जवळचे मित्र तानाजी मालसूरे यांचे जीवन व सिंहगडचा पराक्रम दर्शवण्यात आला आहे. या चित्रपटात अजय देवगन व्यतिरिक्त काजोल, सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.