ऐश्वर्या राय माझी आई, लंडनमध्ये IVF द्वारे दिला होता जन्म; 32 वर्षीय तरुणाचा दावा

एका 32 वर्षीय तरुणाने ऐश्वर्याचा मुलगा असल्याचा दावा केला आहे. संगीत कुमार, असं या तरुणाचं नाव आहे. ऐश्वर्या राय ही माझी आई आहे. माझा जन्म हा आईवीएफ (इन विट्रो फर्टिलाइजेशन) द्वारे लंडनमध्ये झाला आहे, असंही संगीत कुमारने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

Aishwarya Rai Bachchan (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्‍वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) संदर्भात सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. एका 32 वर्षीय तरुणाने ऐश्वर्याचा मुलगा असल्याचा दावा केला आहे. संगीत कुमार, असं या तरुणाचं नाव आहे. ऐश्वर्या राय ही माझी आई आहे. माझा जन्म हा आईवीएफ (इन विट्रो फर्टिलाइजेशन) द्वारे लंडनमध्ये झाला आहे, असंही संगीत कुमारने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका महिलेने गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांची मुलगी असल्याचा दावा केला होता. आता ऐश्वर्या रायसंदर्भातही अशा चर्चांना उधाण आलं आहे. संगीत कुमारने आपला जन्म 1988 मध्ये झाला होता. त्यावेळी ऐश्‍वर्या राय 15 वर्षांची होती, असं म्हटलं आहे. ऐश्वर्या रायच्या आई-वडिलांनी माझी 2 वर्ष देखभाल केली होती. त्यानंतर वडील मला वेदीवेलू रेड्डी हे विशाखापट्टणम येथे घेऊन आले. तसेच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या जन्मासंबंधीत सर्व कागदपत्र नष्ट करून टाकले. कागदपत्र असते, तर मी नक्की पुरावा दाखवला असता, असा दावाही संगीत कुमारने केला आहे. (हेही वाचा - फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लवकरच अडकणार लग्नबंधनात?; जाणून घ्या Javed Akhtar यांची प्रतिक्रिया)

 

View this post on Instagram

 

✨❤️🎊

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

विशेष म्हणजे ऐश्वर्या रायचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या संगीत कुमारला आपल्या आईबरोबर म्हणजेच ऐश्वर्यासोबत मुंबईमध्ये राहायचे आहे. आता या सर्व प्रकारानंतर ऐश्वर्या काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी केरळमधील एका महिलेने ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल या माझी आई असल्याचा दावा केला होता. करमाला मोडेक्स, असं या महिलेचं नाव होतं. या महिलेने अनुराधा पौडवाल यांच्याकडे त्यांनी 50 कोटींची नुकसानभरपाई मागतली होती. त्यानंतर न्यायालयाने पौडवाल यांना नोटीस बजावत 27 जानेवारीला हजर राहायला सांगितलं आहे.