Kiss Day 2024:ॲनिमलमधील रणबीर कपूर-तृप्ती डिमरीपासून ते १२वी फेलमधील विक्रांत मॅसी-मेधा शंकरपर्यंत, गेल्या वर्षीचे 7 बॉलीवूड किसिंग सीन्स (व्हिडिओ पहा)

किस डे 2024 च्या निमित्ताने, 2023 मध्ये मागे वळून आणि गेल्या वर्षीच्या बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट किसेस यादी करून आपल्यातील प्रत्येकामध्ये रोमँटिक भाव जागवू या आणि आजचा हा सुंदर दिवस साजरा करूया..

Kiss Day 2024

Kiss Day 2024: 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा किस डे दिवस हा बहुप्रतीक्षित 14 फेब्रुवारीला येणाऱ्या व्हॅलेंटाईन डे च्या एक दिवस आधी साजरा केला जातो. जगभरातील जोडप्यांसाठी हा प्रसंग खूप महत्त्वाचा आहे, कारण हा दिवस  भावना व्यक्त करण्याची आणि भावनिक संबंध अधिक दृढ करण्याची अनोखी संधी प्रदान करतो. साधे पण शक्तिशाली हावभाव - एक किस असा हा दिवस साजरा केला जातो. किस डे हा दिवस एकमेकांत जवळीक वाढवण्याच्या आणि भागीदारांमधील बंध मजबूत करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. किस डे ही केवळ शारीरिक क्रिया नसून हे प्रेम, उत्कटता आणि भावना प्रियकराला किंवा प्रेयसीला सांगण्याचे प्रतिक आहे. सिनेमात, किसची उत्कटता, आत्मीयता आणि मोह व्यक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हॉलिवूडपासून बॉलीवूडपर्यंत, प्रेक्षकांच्या स्मृतीमध्ये काही प्रतिष्ठित ऑन-स्क्रीन किसेस कोरली गेली आहेत, जसे की टायटॅनिकमधील जॅक आणि रोझ यांच्यातील किस  आणि राजा हिंदुस्तानीमधील फ्रेंच किस असेल तर किस डे 2024 च्या निमित्ताने, 2023 मध्ये मागे वळून आणि गेल्या वर्षीच्या बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट किसेस यादी करून आपल्यातील प्रत्येकामध्ये रोमँटिक भाव जागवू या आणि आजचा हा सुंदर दिवस साजरा करूया..

पाहा व्हिडीओ 

तू झुठी में मक्कर 

तू झुठी में मक्करमध्ये रणबीर कपूर आणि श्रध्दा कपूर या दोन मुख्य कलाकारांनी अनेक किसेस घेतले होते, जी चंचल ते उत्कटतेपर्यंत होती.

1920: हॉरर्स ऑफ द हार्ट

बालिका वधू फेम अविका गोरने हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती ज्यात तिचा सहकलाकार डॅनिश पांडोरसह तिचे काही तीव्र किसचे दृश्ये होती.

लस्ट स्टोरीज 2

 तमन्ना भाटियाने Netflix वर रीलेज झालेल्या तिचा खऱ्या आयुष्यातील प्रियकर विजय वर्मासोबत उत्कट प्रेमसंबंध सादर करून दीर्घकाळ ऑन-स्क्रीन कीस करून पुन्हा कीस न करण्याचे धोरण मोडले.

रॉकी और रानी की प्रेम कहानी

 करण जोहर दिग्दर्शित रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यातच नव्हे तर धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील अनेक kisses चे दृश्ये देखील आहेत.  रणवीर आणि आलिया यांच्यातला लिफ्टमधील किस अनेकांचा फेव्ह आहे.

12वी फेल 

विधू विनोद चोप्राचा चित्रपटातील किस काही कारणास्तव हटवण्यात आला आहे. विक्रांत मॅसी आणि मेधा शंकर यांच्यातील हे किस चित्रपटातून हटविण्यात आले होते, जे इतके सुंदर किस दृश्य असल्याने दुःखी झाले.

Animal 

वर्षभरात सर्वाधिक चर्चेत आलेले एक किस असेल तर ते रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यातील चुंबनाचे असेल. अभिनेत्याने रश्मिका मंदान्नासोबत काही छान ऑनस्क्रीन किस देखील केली आहे.

खो गए हम कहा

नेटफ्लिक्सवरील मैत्री गाथेतील सर्व प्रमुख कलाकारांसाठी काही चुंबन दृश्ये होती, परंतु अनन्या पांडे आणि रोहन गुरबक्सानी यांच्यातील किस वेगळे होते.

 

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif