तब्बल 6 सेलिब्रिटी आज साजरा करत आहेत आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस; जाणून घ्या कोण आहेत या जोड्या
याच मुहूर्तावर उरल्या सुरल्या मंडळींनीही आपल्या जोडीदाराच्या गळ्यात माळ घातली. यातील सर्वात चर्चित लग्न ठरले ते ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे.
2018 हे वर्षे अनेक सेलेब्जसाठी खास ठरले. मागच्या वर्षी अनेक जोड्या लग्नबंधनात अडकल्या. 2018 मध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लग्नाचे मुहूर्त होते, म्हणूनच लग्नाळू लोकांनी जितके काही मुहूर्त मिळतील त्या-त्या मुहूर्तावर जमेल तसे डोक्यावर अक्षता पाडून घेतल्या. यात बॉलीवूडकर कसे मागे राहतील? सोनम कपूर, दीपिका पदुकोन आणि प्रियंका चोप्रा या तीन आघाडीच्या तारकाही मागच्या वर्षी विवाहबंधनात अडकल्या. मात्र ‘12 डिसेंबर' हा 2018 मधील लग्नाचा खास मुहूर्त होता. याच मुहूर्तावर उरल्या सुरल्या मंडळींनीही आपल्या जोडीदाराच्या गळ्यात माळ घातली. यातील सर्वात चर्चित लग्न ठरले ते ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे.
तर आज म्हणजे 12 डिसेंबर 2019 रोजी तब्बल 6 सेलेब्ज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस (Marriage Anniversary) साजरा करीत आहेत. चला पाहूया कोण आहेत या जोड्या.
इशा अंबानी - आनंद पिरामल -
मोठ्या धुमधडाक्यात 12 डिसेंबर 2018 रोजी अंबानी कन्येचा विवाहसोहळा पार पडला. 700 करोड रुपयांचे लग्न म्हणून या लग्नाकडे पहिले गेले. मुंबईतील ‘अँटिलीया’ या अंबानींच्या आलिशान घरात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूड, राजकारणी, क्रीडा आणि उद्योग विश्वातले अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. आज हे कपल आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करीत आहे.
कपिल शर्मा- गिन्नी छत्रत -
कॉमेडी किंग कपिल शर्मा याने याच दिवशी आपली प्रेयसी गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली होती. हा विवाह जालंधरमध्ये मोजक्याच मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. महत्वाचे म्हणजे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच कपिल वडील बनला आहे. 10 डिसेंबर रोजी कपिलच्या घरी कन्येचे आगमन झाले.
रघु राम – नताली दी ल्युचो -
‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता रघु राम 2018 मध्ये दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला. कॅनेडियन प्रेयसी नताली दी ल्युचो हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली. दाक्षिणात्य पद्धतीने रघु राम आणि नतालीचा विवाहसोहळा पार पडला. 2018 च्या सुरुवातीला रघुने पत्नी सुगंधा गर्ग हिच्याशी घटस्फोट घेतला होता, त्यानंतर रघु आणि नताली हे दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आज हे कपल आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करीत आहे.
पारुल चौहान - चिराग -
स्टार प्लस वाहिनीवरील ‘बिदाई’फेम अभिनेत्री पारूल चौहान हिचा विवाहसोहळाही 12 डिसेंबर 2018 रोजी संपन्न झाला होता. चिराग ठक्करसोबत ती विवाहबंधनात अडकली. मुंबईतल्या इस्कॉन मंदिरात अगदी सध्या पद्धतीने पारुलने लग्न केले. दोन वर्षांपासून पारुल आणि चिराग रिलेशनशिपमध्ये होते. (हेही वाचा: Happy Birthday Rajinikanth: हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार, जाणून घ्या रजनीकांत विषयी 'या' थक्क करणाऱ्या गोष्टी)
अदिती गुप्ता - कबीर चोप्रा -
स्टार प्लसच्याच ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून छोट्या पडद्या अवतरलेली अभिनेत्री अदिती गुप्ताही आज आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहे. मागच्या वर्षी ती कबीर चोप्रासोबत विवाहबंधनात अडकली होती. या लग्नासाठी दृष्टी धामी, कृतिका कर्मा, अनिता हसनंदानी अशा अनेक छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्री उपस्थित होत्या.
श्रेया कपूर- अमित देसाई -
12 डिसेंबर 2018 चा मुहूर्त साधून गायिका अलका याग्निक यांनीदेखील आपल्या मुलीचा विवाहसोहळा पार पाडला. अलका याग्निक यांची मुलगी श्रेया कपूर ही अमित देसाईसोबत विवाहबंधनात अडकली होती. आज हे जोडपेही आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करीत आहे.