लॉकडाउनमध्ये पानी-पुरी आणि बेसन बर्फीचा आनंद घेत आहे विराट कोहली-अनुष्का शर्मा, पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

अनुष्काने पाणी पुरी आणि बेसनचा बर्फीचा फोटो शेअर केला आहे. ते तिच्या आईने घरी बनवले असल्याचेही तिने सांगितले. लॉकडाउनमुळे अनुष्का पती विराटसमवेत आई-वडिलांच्या घरात बंद आहे.

अनुष्का शर्मा-विराट कोहली घेत आहे पानी-पुरी आणि बेसन बर्फीचा आनंद (Photo Credit: Instagram)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशात लॉकडाऊन असले तरी या कठीण काळातही काही लोकांनी स्वत: ला आनंदी ठेवण्याचा मार्ग शोधला आहे. यावेळी कोणीतरी पेटिंग, तर कोणी रामायण आणि महाभारत टीव्हीवर पाहून आनंदित आहे. पण बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांची शैलीच निराळी आहे. नेहमी डाएटकडे लक्ष देणारे अनुष्का आणि विराट सध्या लॉकडाउनमध्ये निरनिराळ्या पदार्थांचा आनंद घेत आहे. लॉकडाउनमुळे अनुष्का पती विराटसमवेत आई-वडिलांच्या घरात बंद आहे. अशा परिस्थितीत अनुष्का सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांच्या वाढदिवशी त्यांनी चॉकलेट केक बनविला होता, ज्याचा फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केला होता. अनुष्का सोशल मीडियावर प्रत्येक वेळी काही नवीन डिशचा फोटो शेअर करते आणि यावेळी तिने असेच काहीसे केले आहे जे पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. (Lock Down काळात बॉलिवूड सेलिब्रिटी बनले शेफ; दीपिका पादुकोण, कार्तिक आर्यन सहित 'या' मंडळींनी बनवल्या लज्जतदार रेसिपी)

अनुष्काने यावेळी पाणी पुरी आणि बेसनचा बर्फीचा फोटो शेअर केला आहे. ते तिच्या आईने घरी बनवले असल्याचेही तिने सांगितले. तुम्हीही पाहा:

अलीकडेच अनुष्काने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती आपल्या घरातील सदस्यांसह गेम खेळताना दिसली आहे. या फोटोत अनुष्का आपल्या कुटूंबासमवेत मोनोपोली खेळत होती. यापूर्वी अनुष्का कोहलीचे केस कापतानाही दिसली होती. हा व्हिडिओ विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना विराट कोहलीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "यावेळी घरी." हा व्हिडिओ पाहून इतरांनीही त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला होता. यात क्रिस्टियानो रोनाल्डो, सुरेश रैना यांचा समावेश आहे. यावेळी, अनुष्का आणि विराट या दोघांनीही बर्‍याच वेळेस लोकांमध्ये जागरूकता मोहीम राबविली आहेत. कोरोनाविरूद्ध पीएम-केअर्समधेही त्यांनी अज्ञात निधीचं योगदान दिलं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif