Anita Hassanandani Announces Pregnancy: 'नागिन' अभिनेत्री अनिता हसनंदानीने केली प्रेग्नेंसीची घोषणा, पाहा क्यूट व्हिडिओ

अभिनेत्री आणि तिचा नवरा उद्योगपती रोहित रेड्डी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड करून ही माहिती दिली, जाणून घ्या अधिक माहिती

Anita Hassanandani Announces Pregnancy

Anita Hassanandani Announces Pregnancy: टेलिव्हिजन अभिनेत्री अनिता हसनंदानीने शनिवारी तिच्या सोशल मीडियावर आपण गर्भवती असल्याचे उघड केले. अभिनेत्री आणि तिचा नवरा उद्योगपती रोहित रेड्डी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड करून ही माहिती दिली. अनिता हसनंदानी यांनी या व्हिडिओ क्लिपद्वारे तिची प्रेमकथा, एंगेजमेंट आणि लग्नातील सुंदर क्षण शेअर केले आहेत. या क्लिपमध्ये, अनिता तिच्या गर्भधारणेची अधिकृत घोषणा करताना तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे, तर रोहित अनिताच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

हा सुंदर व्हिडिओ शेअर करताना अनिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, "❤️+❤️=❤️❤️❤️" अनिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनिता हसनंदानीचे अनेक चाहते तिचे या क्यूट पोस्टवर अभिनंदन करत आहेत. या पोस्टवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी अभिनेता करणवीर सिंग बोहराने लिहिले, "वाह व्वा, खूप अभिनंदन. हे खूप छान आहे." अनिता आणि रोहितचे लग्न 18 ऑक्टोबर 2013 रोजी गोव्यात झाले.