Actor Karan Bendre Wedding Photos: अभिनेता करण बेंद्रे अडकला लग्नबंधनात; पहा त्याच्या लग्न सोहळ्याचे फोटोज

त्याची गर्लफ्रेंड निकीता नारकर (Nikita Narkar) सोबत त्याने लग्न केले आहे.

Actor Karan Bendre| Photo Credits: instagram

दिवाळी, तुळशीच्या लग्नानंतर आता लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. यामध्ये आता मराठी कलाकारांच्या घरातही लग्नाचे बार उडण्यास सुरुवात झाले आहे. यंदा 30 नोव्हेंबरला सई लोकूर- तीर्थदीप रॉय (Sai Lokur- Tirthadeep Roy) प्रमाणेच अभिनेता करण बेंद्रे (Actor Karan Bendre)  देखील लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याची गर्लफ्रेंड निकीता नारकर (Nikita Narkar) सोबत त्याने लग्न केले आहे. नुकतेच या विवाहसोहळ्यातील काही क्षणचित्र त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. Sai Lokur Devkarya Ceremony Photos: नवरी नटली! सई लोकुर हिचा देवकार्य विधीसाठी खणाच्या साडीतील लूक पाहून चाहते झाले फिदा, See Pics.

filmibeat च्या रिपोर्ट्सनुसार, करण आणि निकिता लग्नापूर्वी सहा वर्ष रिलेशनशीप मध्ये होते. मागील महिन्यात काही मोजक्याच कुटुंबांतील व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये त्यांचा साखरपूडा पार पडला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळा हा अगदीच मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

करण- निकिता लग्नाचे फोटो

करण हा अभिनेता असला तरीही निकीता नॉन फिल्मी पार्श्वभूमीची आहे. करण बेंद्रे हा अभिनेता मराठी टेलिव्हिजनवर 'प्रेम पंगा पॉयझन' या मालिकेतून, 'अनन्या' या मराठी नाटकातून रसिकांच्या भेटीला आला होता.