Disha Patani's Father Duped for 25 Lakh: दिशा पाटनीच्या वडिलांची 25 लाखांची फसवणूक; उत्तर प्रदेश सरकारमध्ये उच्च पदाची नोकरी मिळण्याच्या आश्वसनाचे ठरले बळी

या प्रकरणी सध्या पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Disha Patani's Hot Photo

Disha Patani's Father Duped for 25 Lakh: दिशा पाटनी फँटसी ॲक्शन थ्रिलर 'कांगुवा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. या दरम्यान, दिशा पाटनीच्या वडिलांसोबत फसवणूकीची(Jagadish Singh Patani duped) घटना घडल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री दिशा पाटनीचे वडील जगदीश सिंग पाटनी यांना आरोपींनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. (Diljit Dosanjh Gets Notice: हैदराबाद कॉन्सर्टच्या आधी दिलजीत दोसांझला नोटीस; 'ही' गाणी गाण्यास बंदी, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा)

त्यासाठी त्यांच्याकडून 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. जगदीश पाटनी माजी पोलीस अधिकारी आणि बरेलीचे रहिवासी, फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात पडले आणि त्यांनी 25 लाख रुपयांची रक्कम आरोपींना दिली. आरोपींनी जगदीश पाटनी यांना कॉलवर यूपी सरकारमधील कॉर्पोरेट संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. जगदीश पाटनी यांनी आरोपींन 20 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले होते. तर, 5 लाख रुपये रोख दिले होते.

पैसे देऊनही काम न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे पाटनी यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बरेली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि आता एफआयआर नोंदवण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, दिशा आणि तिच्या कुटुंबीयांनी अद्याप या घटनेबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. दरम्यान, दिशा पाटनीचा चित्रपट 'कांगुवा' 15 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.