भोजपुरी अभिनेत्री Akshara Singh सह 200 लोकांविरोधात गुन्हा दाखल; नाईट कर्फ्यूचं केलं उल्लंघन
व्हिडिओमध्ये मुन्ना शुक्ला यांच्यासह बरेच लोक मास्क नसताना डान्स करताना दिसत आहेत.
कोरोनामुळे संपूर्ण देशातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांनी रात्रीचे कर्फ्यू लादले आहेत. बिहारमध्येही नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहवरही (Akshara Singh) नाईट कर्फ्यूचे (Night Curfew) उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अहवालानुसार अक्षरा सिंगने बिहारमधील कार्यक्रमात भाग घेतला आणि मास्कशिवाय परफॉर्म केलं. त्यानंतर तिच्यासह 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ लालगंजचे आमदार मुन्ना शुक्ला यांचा आहे. ज्यामध्ये बरेच लोक मास्कशिवाय नृत्य करीत आहेत. व्हिडिओमध्ये मुन्ना शुक्ला यांच्यासह बरेच लोक मास्क नसताना डान्स करताना दिसत आहेत. आपणदेखील या व्हिडिओमध्ये विनामास्क डान्स केल्याचं पाहू शकता. (वाचा - India Fights With COVID: रुग्णालये आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी अभिनेता Sonu Sood ने उचलले महत्वाचे पाऊल; लाँच केला नवीन प्लॅटफॉर्म)
या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात येत आहे की, अक्षरा सिंह, माजी आमदार मुन्ना शुक्ला आणि अन्नू शुक्लादेखील यात दिसत आहेत. हा मुद्दा समोर आल्यानंतर राजकारण तापले आहे.