काय सांगता! Xiaomi कंपनी आपली पहिली कार लाँच करण्याच्या तयारीत, ऑटोमोबाईल जगतात होणार धमाकेदार एन्ट्री
याआधी कंपनीने चीन आणि युरोपियन मार्केट मध्ये इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. आता ही कंपनी ऑटोमोबाईल प्रोजेक्टवर कामर करत आहे.
अगदी अल्पावधी काळात Xiaomi कंपनीने आपले एकाहून एक सरस स्मार्टफोन्स, ब्लूटुथ आणि स्मार्टवॉच सारखे अनेक गॅजेट्स बाजारात आणून आपला चाहतावर्ग निर्माण केला. असे करत एक पाऊल पुढे टाकत आता शाओमी कंपनी ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. लवकरच Xiaomi कंपनी आपली जबरदस्त कार (Car) बाजारात लाँच करणार आहे. याआधी कंपनीने चीन आणि युरोपियन मार्केट मध्ये इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. आता ही कंपनी ऑटोमोबाईल प्रोजेक्टवर कामर करत आहे.
Gizmochina ने दिलेल्या रिपोर्टनुसार, शाओमीने या कारला कुठलाही ठोस अशा निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेली नाही. या कार बनविण्याबाबत शाओमीचा केवळ स्ट्रेटेजिक निर्णय आहे. सूत्रांकडून अशीही माहिती मिळत आहे की ह्या प्रोजेक्टमध्ये शाओमीचे फाउंडर आणि CEO Lei Jun लीड करतील. तथापि अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.हेदेखील वाचा- Xiaomi कंपनीने लॉन्च केला Mi स्मार्ट टीव्ही, धमाकेदार फिचर्स ऐकून व्हाल हैराण
या आधी शाओमीने कंपनीने स्मार्टफोन्स होम डिवायसेस सेगमेंटमधील देखील अनेक उपकरणे लाँच केले आहेत. त्याचबरोबर त्यांचा इलेक्ट्रिक व्हीकल सेगमेंट जास्त लोकप्रिय होत आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री पदार्पण करण्यासोबत शाओमी कंपनी आपल्या रिसर्च आणि डेवलपमेंट टीम आणि इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरमध्ये आपले एक्सपर्टीजमध्ये सुधारणा करु शकते.
थोडक्यात शाओमी आता हळूहळू प्रत्येक इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आपले पाय रोवू लागली आहे. शाओमीच्या कारला घेऊन भले अनेक अफवा कानावर येत असल्या तरीही कंपनीने या कारविषयी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र कंपनी लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अलीकडेच शाओमी कंपनीने त्यांचा Mi Tv Q1 लॉन्च केला आहे. हा टीव्ही 75 इंचाच्या स्क्रिन साइजमध्ये येणार आहे. याची किंमत EUR 1,299 म्हणजेच 1,14,300 रुपये आहे. स्मार्ट टीव्हीची विक्री मार्च 2021 पासून सुरु होणार आहे.