Triumph Street Triple R भारतात लॉन्च, किंमत 8.84 लाख रुपये
Triumph Motorcycles India यांनी देशात आपली 2020 Triumph Street Triple R लॉन्च केली आहे. याची किंमत जवळजवळ 8.84 लाख रुपये आहे, कंपनीने ही बाईक टॉप स्पेक Triumph Street Triple RS च्या खाली दर्शवली आहे. याची किंमत 11.3 लाख रुपये आहे. कंपनीने यापूर्वीच Street Triple R ची बुकिंग सुरु केली होती
Triumph Motorcycles India यांनी देशात आपली 2020 Triumph Street Triple R लॉन्च केली आहे. याची किंमत जवळजवळ 8.84 लाख रुपये आहे, कंपनीने ही बाईक टॉप स्पेक Triumph Street Triple RS च्या खाली दर्शवली आहे. याची किंमत 11.3 लाख रुपये आहे. कंपनीने यापूर्वीच Street Triple R ची बुकिंग सुरु केली होती. बुकिंगसाठी ग्राहकांना मात्र 1 लाख रुपये द्यावे मोजावे लागले होते. स्ट्रिट ट्रिपल आर ही स्ट्रिट ट्रिपल एस मॉडेलचे रिप्लेसमेंट असून जी बेस मॉडेल आहे.(Honda CBR1000RR-R फायरब्लैड आणि SP वेरियंटमधील बाईकची भारतात बुकिंग सुरु, जाणून घ्या फिचर्स)
Triumph Street Triple R मध्ये 765cc चे इन-लाइन थ्री सिलेंडर इंजिन दिले आहे जो RS मध्ये आहे. परंतु हे इंजिन थोड्या कमी ट्यूनसह येणार आहे. Street Triple R चे इंजिन 12,000 rpm वर 116 bhp ची पॉवर देणार आहे. तर RS चे इंजिन 11,750 rpm वर 121 bhp ची पॉवर निर्माण करणार आहे. टॉर्क दोघांमध्ये सम असून 9350 rpm वर 79 bhp चे असल्याचे पहायला मिळते. Street Triple RS च्या तुलनेत Street R मध्ये वेगळी रेक आणि ट्रेल दिसून येणार आहे.
फिचर्स बाबत बोलायचे झाल्यास स्ट्रिट ट्रिपल आर मध्ये TFT इंस्ट्रुमेंट कंसोल व्यतिरिक्त एक अॅनालॉग कंसोल डिजिटल पार्ट दिसून येणार आहे. जो जुन्या जनरेशच्या मॉडेल सारखा आहे. कलर्स आणि ग्राफिक्स R मॉडेल्सवर पहायला मिळणार आहे. सायकलिंग पार्ट्स बद्दल सांगायचे झाल्यास, Street Triple R मध्ये ब्रेम्बो M4.32 फोर पिस्टन मोनोब्लॉग कॅपिलर्ससह 310 mm द्विन डिस्क दिले आहे. तर RS मॉडेलमध्ये M50 कॅपिलर्स पहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त R मॉडेल आणि RS च्या तुलनेत 2 किलोग्रॅम भारी असून याचे वजन एकूण 168 किलोग्रॅम आहे. तर Street Triple R बाईकचे वजन 166kg आहे.(BMW S 1000 XR प्रो भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)
2020 Triumph Street Triple R याची टक्कर भारतीय बाजारात KTM 790 Duke आणि Kawasaki Z900 सोबत होणार आहे. तर Kawasaki चे BS6 मॉडेल आधीपासूनच भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. BS6 790 Duke ही लवकरच BS6 च्या रुपात लॉन्च केली जाऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)