BMW S 1000 XR प्रो भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
BMW S 1000 XR Pro (Photo Credits-Twitter)

BMW Motorrad यांनी भारतीय बाजारात त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक विक्री केली जाणारी अॅडव्हेंचर स्पोर्ट बाईक BMW S 1000 XR प्रो भारतात लॉन्च करण्यात आली आहे. नवी बाईक पूर्णपणे बिल्ट-अप युनिट (CBU) च्या रुपात BMW मोटोराड डीलर्स नेटवर्कच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीने या बाईकची किंमत 20.90 लाख रुपये ठेवली आहे. नवी बीएमडब्लू एस 100 एक्सआर कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. ही एक ऑल-डे स्पोर्ट्स बाईक असल्याचे सांगण्यात आले आहे. GS याची सरळ आणि आरामदायी सीट पोझिशन चालवताना तुम्हाला आनंद देते.

बीएमडब्लू ग्रुप इंडियाच्या अॅक्टिंग प्रेसिडंट आरलिंडो टेक्सेरा यांनी असे म्हटले आहे की, नवी BMW S 100 XR अॅडव्हेंचर स्पोर्ट सेंगमेंट मधील एक नवे Benchmark स्थापित करेल. ही एक पॉवर-पॅक्ड परफॉर्मर असून रेसट्रॅकचा वास्तविक अनुभव साधारण रस्त्यांवर मिळणार आहे. तर बीएमडब्लूची ही नवी बाईक चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.(BGauss A2 आणि BGauss B8 इलेक्ट्रिक स्कूटर ऑगस्ट 2020 मध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स)

या बाईकच्या पुढील बाजूस फेयरिंग, बॉडी पॅनल्स आणि फ्युल टँक डिझाइन अपडेट पहायला मिळणार आहे. हेडलाईड डिझाइन सुद्धा नवी देण्यात आली आहे. यामध्ये फुल LED लाइटिंग ही दिली आहे. कंपनीने यामध्ये 999 cc, इन-लाइन फोर सिलिंडर इंजिन दिले आहे. जे BMW S 1000 RR वर आधारित आहे. XR ला अधिक उत्तम लो आणि मिड रेंज साठी ट्यून करण्यात आले आहे. इंजिन 11,000 RPM वर 165 bhp ची पॉवर आणि 9250 RPM वर 114 NM टॉर्क जनरेट करणार आहे. 0 ते 100 kmph चा वेग पकडण्यासाठी बाईकला 3.3 सेकंदाचा वेळ लागणार आहे. याची टॉप स्पीड 200 kmph पेक्षा अधिक आहे.(Hero Xtreme 160R भारतात लॉन्च, 4.7 सेंकदात पकडणार 0-60 kmph चा वेग)

नव्या BMW S 100 XR ही तीन वर्ष, अनलिमिटेड किलोमीटर्सची स्टँडर्ड वॉरंटीसह उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये चौथ्या आणि पाचव्या वर्षाला वॉरंटी वाढवण्याची सुद्धा सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. रोड साइड असिस्टंट जो 24X7 365 दिवस असे पॅकेज आहे. ब्रेकडाउन आणि टोइंग सेवा सुद्धा सुनिश्चित करण्यात आली आहे.