सिंगल चार्जमध्ये 375 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम ठरतील भारतातील 'या' इलेक्ट्रिक कार

कारण यंदाच्या वर्षात दमदार इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत. आतापर्यंत भरतात जेवढ्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत त्यामधील बहुतांश कारची किंमत सामान्य व्यक्तींच्या शिखाबाहेरील असावी.

Electric Vehicle. Representational image. (Photo Credits: GeoMarketing)

2021 हे वर्ष ऑटोमोबाईक सेक्टरसाठी अत्यंत खास असणार आहे. कारण यंदाच्या वर्षात दमदार इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत. आतापर्यंत भरतात जेवढ्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत त्यामधील बहुतांश कारची किंमत सामान्य व्यक्तींच्या शिखाबाहेरील असावी. अशातच आता ऑटोमेकर्सकडून अशा काही इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत ज्या उत्तम रेंजसह शिखाला परवडणारी सुद्धा ठरणार आहे. त्याबद्दलच आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.(2021 Volkswagen T-Roc SUV भारतात लॉन्चिंगसाठी तयार, जाणून घ्या किती असू शकते किंमत)

Strom R3 ही एक थ्री व्हिलर इलेक्ट्रिक कार असून ज्यामध्ये ग्राहकांना 2 दरवाजे, 2 सीट्स आणि मोठा सन रुफ दिला जाणार आहे. या कारची सुरुवाती किंमत 4.5 लाख रुपये असणार आहे. भारतातील ही सर्वाधिक कमी किंमतीतील इलेक्ट्रिक कार असणार आहे. यामध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला गेला आहे. जो 1 लाख किली किंवा 3 वर्षांची वॉरंटीसह मार्केटमध्ये उतरवली जाणार आहे. कंपनीने 10 हजार रुपयांच्या टोकन आमाउंटमध्ये या कारची बुकिंग करण्यास सुरुवात केली असून ती मे महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते.

Mahindra eXUV300 इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 375 किमीचे अंतर कापू शकणार असून ती लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते. Mahindra eXUV300 कंपनीची पॉप्युरल सब कॉम्पेक्ट एसयुवीचे इलेक्ट्रिक रुप आहे. डिझानबद्दल बोलायचे झाल्यास ही XUV300 सारखीच असणार असून त्यात काही मोठे बदल केले जाणार नाही आहेत.(कारवरील Dent काढण्यासाठी 'या' सोप्प्या ट्रिक्स बद्दल अधिक जाणून घ्या)

Mahindra eKUV100 मध्ये 15.9 किलोवॅटचे लिक्विड कूल मोटर लावले गेले असून ते 54PS ची पॉवर 120NM चा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आपली पॉवरफुल बॅटरीमुळे एसयुवी जवळजवळ 147 किमी पर्यंतची रेंज कापण्यास सक्षम असणार आहे. याच्या फास्ट चार्जिग फिचरमुळे 80 टक्के ती चार्ज होण्यास 50 मिनिटे लागणार आहे. याची किंमत 8-9 लाखांदरम्यान असू शकते.