लोकप्रिय कार Suzuki Swift सुरक्षिततेच्या बाबतीत झाली नापास; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले 0-स्टार रेटिंग
मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) कार ही भारतामधील एक लोकप्रिय कार समजली जाते. देशातील अनेक मध्यमवर्गीयांचे गाडीचे स्वप्न या कारने पूर्ण केले आहे. लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम किंवा लॅटिन एनसीएपीने (Latin NCAP) अलीकडेच त्या क्षेत्रात विकल्या जाणाऱ्या सुझुकी स्विफ्टची क्रॅश-चाचणी केली
मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) कार ही भारतामधील एक लोकप्रिय कार समजली जाते. देशातील अनेक मध्यमवर्गीयांचे गाडीचे स्वप्न या कारने पूर्ण केले आहे. लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम किंवा लॅटिन एनसीएपीने (Latin NCAP) अलीकडेच त्या क्षेत्रात विकल्या जाणाऱ्या सुझुकी स्विफ्टची क्रॅश-चाचणी केली. यामध्ये स्विफ्टला सुरक्षा वॉचडॉगकडून शून्य-स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅटिन NCAP द्वारे चाचणी केलेली कार मारुती सुझुकी मोटर गुजरात मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये बनवण्यात आली आहे, म्हणजेच ती मेड इन इंडिया कार आहे. कारला अडल्ट ऑक्यूपंट प्रोटेक्शन 15.53 टक्के रेटिंग मिळाली आहे, तर त्याला मुलांच्या ऑक्यूपंट प्रोटेक्शनसाठी 0 टक्के रेटिंग मिळाली आहे.
पादचारी लोकांची सुरक्षा आणि असुरक्षित ट्रॅक वापरकर्त्यांसाठी कारने 66 टक्के चांगले गुण मिळवले, तरीही सिक्योरिटी असिस्टंस सिस्टम संदर्भात रेटिंग पुन्हा 7 टक्क्यांवर घसरले. अहवालात, लॅटिन एनसीएपी म्हणते, 0 स्टार निकाल खराब साइड इफेक्ट प्रोटेक्शन आणि चाचणी दरम्यान खुले दरवाजे यामुळे आहे. मागील प्रभाव चाचणीसाठी UN32 ची कमतरता, स्टँडर्ड साइड हेड प्रोटेक्शन एअरबॅग्सची कमतरता, स्टँडर्ड ESC ची कमतरता आणि चाचणीसाठी CRS ची शिफारस न करण्याचा सुझुकीचा निर्णय यामुळे कारचा व्हिप्लॅश स्कोअर देखील कमी होता.
लॅटिन NCAP ने असेही म्हटले आहे की, कारचा दरवाजा उघडल्याने UN95 रेग्युलेशन रिक्वायरमेंटला पास करीत नाही. वॉचडॉगने अहवाल दिला की, स्विफ्ट युरोपमध्ये 6 एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलसह मानक म्हणून विकली जाते, तर लॅटिन अमेरिकेत हे मॉडेल साइड बॉडी, हेड एअरबॅग आणि ईएससी स्टँडर्डसह दिले जात नाही. (हेही वाचा: भारताच्या सीरिजमध्ये आता होणार वाहनांचे रजिस्ट्रेशन, दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी येणारी समस्या होईल दूर)
मागच्या जनरेशनची मारुती सुझुकी स्विफ्टने 2014 मध्ये ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये सुरुवातीला 0-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली. त्यावेळी बेस व्हेरिएंटला एअरबॅग आणि एबीएस मानक म्हणून मिळाले नाही. नंतर, जेव्हा सध्याची तिसरी जनरेशन स्विफ्ट सादर केली गेली, युरोपीयन-स्पेक मॉडेलची युरो एनसीएपीने क्रॅश-चाचणी केली आणि युरोपियन वॉचडॉगकडून 3-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले. स्विफ्टच्या स्टँडर्ड व्हेरियंटला 3-स्टार रेटिंग मिळाले, तर पर्यायी सेफ्टी पॅकसह सुसज्ज व्हेरिएंटला युरो एनसीएपी द्वारे 4-स्टार रेटिंग मिळाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)