1 डिसेंबर पासून देशात लागू होणार FASTags योजना; टोल नाक्यावर रोख पैसे देण्याची गरज नाही; जाणून घ्या डीटेल्स

वन नेशन वन फास्टॅग’ (One Nation, One Fastag) योजनेची घोषणा केली होती. 1 डिसेंबर 2019 पासून ही योजना देशभरात राबविली जाईल. ही योजना लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात कोणतेही वाहन रोख पैशांच्या स्वरूपात टोल न देता कुठेही प्रवास करू शकते

Toll Plaza (Image: PTI)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 14 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या इंडियन मोबाईल कॉंग्रेसमध्ये (Indian Mobile Congress), ‘वन नेशन वन फास्टॅग’ (One Nation, One Fastag) योजनेची घोषणा केली होती. 1 डिसेंबर 2019 पासून ही योजना देशभरात राबविली जाईल. ही योजना लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात कोणतेही वाहन रोख पैशांच्या स्वरूपात टोल न देता कुठेही प्रवास करू शकते. सरकार कॅशलेस सिस्टमला सतत प्रोत्साहन देत आहे आणि परिवहन क्षेत्रातील फास्टॅग हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

'एक देश एक फास्टॅग' या विषयावर आयोजित कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, सध्या राष्ट्रीय महामार्गावर एकूण 527 टोल प्लाझा आहेत, त्यापैकी 380 टोल प्लाझाच्या सर्व लेन फास्टॅगसह सुसज्ज आहेत. उर्वरित लेन लवकरच देखील फास्टॅगसह सुसज्ज होतील. 1 डिसेंबरपासून देशातील सर्व टोल प्लाझावर अशी व्यवस्था केली जाईल. फास्टॅगची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणाले की, फास्टॅग यंत्रणा लागू झाल्यानंतर टोल प्लाझावर गर्दी होणार नाही, यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे.

पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखे, केवायसीसाठी आवश्यक आयडी प्रूफ दिल्यानंतर तुमचे फास्टॅग अकाउंट तयार केले जाते. यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक आहे. फास्टॅग सर्व टोल प्लाझा व काही बँकांकडून ऑनलाईन खरेदी करता येईल. फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आरटीजीएस आणि नेट बँकिंगचा वापर करू शकता. आपण आपल्या फास्टॅग खात्यात किमान 100 रुपये आणि एक लाख रुपयांपर्यंत ठेवू शकता. (हेही वाचा: फास्टटॅग बारकोड मिळवा टोल नाक्यावरची अडचण टाळा; सोमवारपासून देशभरातील पेट्रोल पंपांवर उपलब्ध)

वाहनाच्या विंडस्क्रीनमध्ये फास्टॅग बसविला जातो. हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) ने सुसज्ज आहे. आपले वाहन टोल प्लाझावर पोहोचताच, सेन्सरला स्क्रीनवरील फास्टॅग जाणवेल आणि आपल्या खात्यातून टोलचे पैसे वजा केले जातील. अशाप्रकारे टोलसाठी तुम्हाला रोख पैसे देण्याची गरज भासणार नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now