Tata कंपनी घेऊन येणार Mini SUV, टेस्टिंगच्या वेळी कारचा दिसला दमदार लूक

Tata Mini SUV (Photo Credits-Twitter)

टाटा कंपनीची (Tata Company)  मायक्रो एसयुवी Tata HBX पुन्हा एकदा टेस्टिंगच्या वेळी दिसून आली आहे. ही कार कॅमोफ्लॉज फॉर्म मध्ये होती पण त्याचे प्रोडक्शन तयार झालेले ही दिसले. कारचे कॉन्सेप्ट वर्जन कंपनीने ऑटो एक्सपो मध्ये झळकवले होते. ही कार कंपनीच्या ALPA प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. कारचे लीक झालेल्या फोटोंमधून असे समजून येते की, फ्रंट बाजूला ट्राय एरो स्टायलिंगचा वापर करण्यात आलेला आहे.(Tata कंपनी भारतात घेऊन येणार नव्या 3 इलेक्ट्रिक गाड्या, सिंगल चार्जमध्ये 300km चे अंतर धावणार)

टाटा एचबीक्स मिनी एसयुवी आहे. ही कंपनीची लाइनअप मधील सब-कॉम्पॅक्ट एसयुवी नेक्सॉनच्या खाली असणार आहे. याचे फायनल मॉडेल हे त्याच्या कॉन्सेप्ट प्रमाणेच दिसून येणार आहे. एसयुवीच्या फ्रंटला स्प्लिट हेडलॅम्प, फ्लॅट बोनट आणि दरवाज्यांवर प्लास्टिक क्लैंडिग दिले जाणार आहे. मागच्या बाजूला लहान रुफ माउंटेड स्पॉइलर, कॉन्सेप्ट कार सारखे टेलगेट आणि कॉम्पैक्ट टेललाइट असणार आहे. साइडला इंटीग्रेटेड टर्न इंडिकेटर्ससह कन्वेंशनल आउट साइड रियर व्यू मिरर ही मिळणार आहेत.

ऑटो एक्सपोच्या वेळी कारच्या इंटिरियर सुद्धा दिसून आले. कॅबिन बद्दल बोलायचे झाल्यास तर टाटाच्या या लहान एसयुवीच्या आतमध्ये फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हिल, पार्ट डिजिटल 7- इंचाचा इंस्ट्रुमेंटल कंसोल, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल आणि अॅन्ड्रॉइड ऑटो व अॅप्पल कारप्लेसह 7 इंचाचा फ्री-स्टँडिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम सारखे फिचर्स मिळणार आहेत.(Car Safety Features: ABS ते TPMS पर्यंत 'या' 4 उत्तम सेफ्टी फिचर्स शिवाय नवी कार खरेदी करु नका)

टाटा कंपनीची ही लहान एसयुवी फक्त पेट्रोल इंजिनमध्येच येणार आहे. यामध्ये 1.2 लीटर, 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. जो टियागो आणि अल्ट्रॉज मध्ये दिला आहे. हे इंजिन 85bhp ची पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करणार आहे. तर टाटा मोटर्ससाठी सप्टेंबर महिना सेलसाठी उत्तम ठरला. कंपनीने सप्टेंबर 2020 मध्ये 21,2000 युनिट्स सेल करण्यात यश मिळवले आहे. पण गेल्या वर्षात सप्टेंबर 2019 मध्ये कंपनीने फक्त 8,097 युनिट्स सेल केले होते. अशा पद्धतीने कंपनीने 162 टक्के जबरदस्त ग्रोथ केली आहे.