Mahindra नंतर आता Tata कारच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या अधिक
तर 2020 हे पूर्णपणे कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गेले. मात्र यंदाचा काही दिलासा मिळाल्याचे दिसून आले.
गेल्या 2 वर्षांपासून ऑटो सेक्टरमध्ये समस्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. तर 2020 हे पूर्णपणे कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गेले. मात्र यंदाचा काही दिलासा मिळाल्याचे दिसून आले. परंतु एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर वाढण्यास सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम ऑटो सेक्टर पुन्हा झाला. ऑटोमोबाइल सेक्टरची परिस्थिती आता बिघडत चालली असल्याने नाईलाजाने कंपन्यांना त्यांच्या कारच्या किंमती वाढवाव्या लागत आहेत. दिग्गज कार निर्माती कंपनी महिंद्रा नंतर आता टाटा कडून सुद्धा येत्या 8 मे पासून त्यांच्या वाहनांच्या किंमती लागू करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे ग्राहकांना यापूर्वी पेक्षा आता अधिक किंमत कार खरेदीसाठी मोजावी लागणार आहे.(नवी C5 Aircross SUV ची भारतात डिलिव्हरी सुरु; खरेदीशिवाय तुम्हाला घरी घेऊन जाता येणार, जाणून घ्या कसे)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कंपनीने वाहनांच्या किंमतीमध्ये 1.8 टक्क्यांची वाढ होणार आहे. टाटा मोटर्स कडून अशी माहिती समोर आली आहे की, काही वाहन निर्मात्यांनी कारच्या किंमतीत वाढ केली किंवा होणार आहे. ही दुसरी वेळ असेल कंपन्यांनी वर्षभरातच किंमतीत वाढ केली आहे.(MG Motors ची सेल्फ ड्रायव्हिंग SUV Gloster महागली, जाणून घ्या नव्या किंमतीबद्दल अधिक)
टाटा मोटर्सच्या किंमतीत जी वाढ केली जाणार आहे ती सर्व वाहनांच्या मॉडेलवर लागू असणार आहे. किंमतीत वाढ केल्यानंतर ही गोष्ट पहावी लागणार आहे की, वाहन कोणते आहे आणि त्याचे वेरियंट कोणते आहे. मॉडेलनुसार किंमतीमधील वाढ विविध असणार आहे. ज्या लोकांनी वाहनांची बुकिंग 7 मे पूर्वी केली आहे त्यांना वाढीव किंमतीचा सामना करावा लागणार नाही आहे. टाटा मोटर्सच्या पोर्टफोलियो बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये काही कारचा समावेश आहे. त्यामध्ये टाटा सफारी जी नुकतीच लॉन्च केली आहे. टाटा अल्ट्रोज, टियागोसह हॅरियर एसयुवी आणि नेक्सन एसयुवीचा समावेश आहे.