Renault Kwid RXL Easy-R भारतातील सर्वाधिक स्वस्त ऑटोमॅटिक कार, किंमत 4.54 लाख रुपये

Renault Kwid RXL Easy-R (Photo Credits-Twitter)

जर तुमचे बजेट अगदीच कमी आणि तुम्ही ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर Renualt Kwid RXL Easy-R तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरु शकते. Kwid RXL Easy-R एन्ट्री लेव्हल सेगमेंट असण्यासह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑफर करते. प्रीमियम कारमध्येच ऑटोमेटिक ऑप्शन दिला जातो. ही अशी प्रथमच कार आहे ज्यामध्ये AMT ऑप्शन दिले गेले आहे.(Mahindra Electric ची नवी 3-Wheeler Treo Zor लॉन्च; पहा काय आहे खासियत आणि किंमत)

इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास Renault Kwid मध्ये 1.0 लीटर, 999 cc चे ट्रिपल सिलेंडर इंजिन दिले गेले आहे. जे 67 bhp ची पॉवर आणि 91Nm चे पीक टॉर्क जनरेट करणार आहे. या इंजिनसह Easy R AMT 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिले आहे. यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनचे सुद्धा ऑप्शन उपलब्ध आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार 22.5km/I चे मायलेज देणार आहे.(Maruti S-cross चे कंपनीने लॉन्च केले लिमिटेड Addition, किंमत 8.56 लाख रुपये)

फिचर्स संदर्भात सांगायचे झाल्यास, Renault Kwid RXL AMT मध्ये पॉवर स्टिअरिंग, फ्रंट पॉवर विंडो, एअर कंडीशनर, युएसबीसह सिंगल DIN म्युझिक सिस्टिम, ब्लूटुथ आणि Aux कनेक्टिव्हिटी, सेन्ट्रल लॉकिंगसह रिमोट लेस एन्ट्री, फुल्ली डिजिटल इंस्ट्रुमेंट पॅनल, ड्रायव्हर साइड एअरबॅग्स, ABS, EBD, रिवर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट आणि 279 लीटर बूट स्पेस दिले आहे. Renault Kwid RXL Easy-R ची किंमत 4.54 लाख रुपये आहे.